Join us

रुपया वधारताच सोने घसरले, चांदीही ७०० रुपयांनी कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 02:36 IST

मोठी उलाढाल; चांदीही ७०० रुपयांनी कमी

जळगाव : लॉकडाउन काळात सुवर्णबाजार बंद असला तरी मल्टि कमॉडिटी बाजार सुरूच असून, या ठिकाणी मोठी उलाढाल होत असल्याने भावात चढ-उतार होत आहे. दि.१६ रोजी ४७ हजार २५० रुपयांवर पोहोचलेल्या सोन्याच्या दरामध्ये दि. १७ रोजी रुपया ३५ पैशांनी वधारताच ११०० रुपयांनी घसरण होऊन ४६ हजार १५० रुपये प्रती तोळ्यावर आले. चांदीतदेखील ७०० रुपयांची घसरण होऊन ती ४३ हजार ८०० रुपये प्रती किलोवर आली.

कोरोनामुळे गेल्या महिना-दीड महिन्यापासून सोने-चांदीच्या भावावर मोठा परिणाम होत आहे. त्यात आता लॉकडाउनमुळे सुवर्ण पेढ्या बंद आहेत, मात्र मल्टि कमॉडिटी बाजार सुरूच आहे. त्यात दररोज मोठे सौदे होत आहेत. डॉलरने नवी उच्चांकी पातळी गाठली. त्यामुळे कमॉडिटी बाजारात सोने थेट ४७ हजार २५० रुपयांवर पोहचले. १७ रोजी सोन्यात ११०० रुपयांची घसरण झाली असली तरी गेल्या १० दिवसांचे भाव पाहिले तर कमॉडिटी बाजारात सोने २६५० रुपयांनी वधारले आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात गुंतवणूक केली जात असल्याने व रुपयात घसरण होत गेल्याने हे भाव वाढल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.केवळ भारतातच झाले दर कमी१६ रोजी उच्चांकीवर पोहोचलेल्या डॉलरचे मूल्य १७ रोजी ३५ पैशांनी कमी होऊन तो ७६.५१ रुपयांवर आला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव कमी झाले नसताना रुपया वधारल्याने भारतात सोने ११०० रुपयांनी कमी झाले.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यासोनं