गेल्या काही सत्रांत सोन्याच्या दरात मोठे चढ-उतार बघायला मिळत आहेत. नफावसुली अर्थात प्रॉफिट बुकिंगमुळे 'MCX गोल्ड, एप्रिल कॉन्ट्रॅक्ट' त्याच्या उच्चांकावरून सुमारे १८% खाली आले आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, दीर्घकाळासाठी सोन्याचा कल अजूनही सकारात्मक असल्याचे मत बाजार तज्ज्ञांनी वर्तवले आहे.
जागतिक स्तरावरील भू-राजकीय तणाव, आर्थिक जोखीम आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची शक्यता, यांमुळे सोन्याला आधार मिळत आहे. विशेष म्हणजे, मध्यवर्ती बँकांनी अजूनही मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी होत आहे. चीनच्या मध्यवर्ती बँकेने सलग १५ व्या महिन्यात सोन्याची खरेदी केली असून जानेवारीत आपल्या साठ्यात ४०,००० ट्रॉय औंसची वाढ केली आहे.
कोटक सिक्युरिटीजचे अनिंद्य बॅनर्जी यांच्या मते, मोठ्या तेजीनंतर १०% तांत्रिक घसरण सामान्य आहे. MCX वर सोन्याचा भाव १.४ लाखांपर्यंत खाली येणे शक्य आहे, मात्र हा बदल तात्पुरता असेल. याशिवाय, इंडसइंड सिक्युरिटीजचे जिगर त्रिवेदी आणि एसएमसी ग्लोबलच्या वंदना भारती यांचेही मत आहे की, अंडरटोन सकारात्मक आहे. सध्या सोने १.५७ ते १.५८ लाख रुपयांच्या दरम्यान व्यवहार करत आहे. १.४० ते १.४५ लाखांचा स्तर हा खरेदीसाठी उत्तम 'डिमांड झोन' मानला जात आहे.
जानेवारी २०२६ मध्ये गोल्ड ETF मधील गुंतवणूक दुपटीने वाढून २४,०३९ कोटींवर पोहोचली. यावरून किरकोळ गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास दिसून येतो.
तज्ज्ञांच्या मते, जोपर्यंत डॉलर इंडेक्समध्ये ₹१०५-₹१०६ च्या वर मोठी उसळी येत नाही आणि जागतिक तणावात कमी होत नाही, तोपर्यंत सोन्यात मोठ्या घसरणीची शक्यता कमी वाटते. अशा परिस्थितीत, ₹१.४८ लाख सपोर्ट आणि ₹१.६० लाख रेजिस्टेंस दरम्यान कंसोलिडेशनची शक्यता आहे.
Web Summary : Gold prices fell 18% due to profit booking. Experts believe geopolitical tensions and potential rate cuts support gold. A further drop to ₹1.4 lakh is possible, but the overall outlook remains positive, with strong investor confidence.
Web Summary : मुनाफावसूली के कारण सोने की कीमतों में 18% की गिरावट आई। विशेषज्ञों का मानना है कि भू-राजनीतिक तनाव और संभावित दर कटौती सोने का समर्थन करते हैं। ₹1.4 लाख तक और गिरावट संभव है, लेकिन समग्र दृष्टिकोण सकारात्मक बना हुआ है।