Join us

सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 06:14 IST

दिवाळीच्या काळातही ही वाढ सुरूच आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने भावात ४५० रुपयांची वाढ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी पुन्हा ४०० रुपयांची वाढ झाली.

जळगाव : सण-उत्सवाच्या काळात सोने-चांदीच्या भावात वाढ सुरूच असून लक्ष्मीपूजनाच्या दोन दिवस अगोदरच बुधवारी (३० ऑक्टोबर) ४०० रुपयांची वाढ होऊन सोने भावाने ८० हजार रुपयांचा पल्ला गाठला. चांदीच्या भावातही एक हजार ३०० रुपयांची वाढ होऊन ती ९९ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली.

दिवाळीच्या काळातही ही वाढ सुरूच आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने भावात ४५० रुपयांची वाढ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी पुन्हा ४०० रुपयांची वाढ झाली. या वाढीने सोने भावाने प्रथमच ८० हजार रुपयांचा टप्पा गाठला आहे. एक तोळे सोन्यासाठी जीएसटीसह ८२ हजार ४०० रुपये मोजावे लागणार आहे. 

धनत्रयोदशीला चांदीत एक हजार ५०० रुपयांची वाढ झाली व ती ९८ हजार २०० रुपये प्रति किलोवर पोहोचली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी पुन्हा एक हजार ३०० रुपयांची वाढ झाली. दोन दिवसात चांदी भावात दोन हजार ८०० रुपयांची वाढ होऊन ती ९९ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

टॅग्स :सोनंचांदीव्यवसाय