Gold Silver Price News: इराण-इस्रायल युद्ध जसजसं वाढत आहे, तसतसं देशांतर्गत शेअर बाजार कोसळत आहे. मात्र, सोन्या-चांदीची चाल याच्या अगदी उलट दिसत आहे. आतापर्यंत असं मानलं जात होतं की युद्धाच्या परिस्थितीत दोन्ही धातूंचे भाव वाढतात, परंतु सध्या चित्र उलटं आहे. युद्धाच्या दरम्यान सोन्याचे भाव १२,३६४ रुपये प्रति १० ग्रॅमनं घसरलेत, तर याच काळात चांदी ३७,७६५ रुपये प्रति किलोनं स्वस्त झाली आहे. सोमवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव १,४६,७३३ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला, तर चांदी २,३०,१३५ रुपये प्रति किलोवर बंद झाली.
आयबीजेए (IBJA) च्या दरांनुसार, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सोने १,५९,०९७ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले होते, तर चांदी २,६७,९०० रुपये प्रति किलो होती. दुसऱ्याच दिवशी २८ फेब्रुवारीला इस्रायलनं इराणवर हल्ला केला. (शनिवार आणि रविवार आयबीजेए दर जाहीर करत नाही).
ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी मोठे बदल! १ एप्रिलपासून F&O नियमांमध्ये होणार मोठे बदल
दरातील घसरणीची प्रमुख कारण?
गुंतवणुकीचा ओघ मंदावला : गेल्या काही दिवसांतील विक्रमी तेजीनंतर आता सोन्यातील गुंतवणुकीचा वेग थंडावला आहे. यामुळेच बाजारात सध्या मोठी तेजी येण्याची शक्यता कमी दिसत आहे.
मजबूत डॉलरचा दबाव : अमेरिकन डॉलरमधील मजबूतीमुळे सोन्याच्या किमती कमकुवत झाल्या आहेत. जेव्हा डॉलर मजबूत होतो, तेव्हा इतर चलन असलेल्या देशांसाठी सोने खरेदी करणं महाग होतं, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी होते.
कच्च्या तेलाच्या किमती : कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींनी गुंतवणूकदारांचं लक्ष वेधून घेतलं आहे. जे गुंतवणूकदार सोने-चांदीत पैसे लावत होते, त्यांनी आता आपला मोर्चा क्रूड ऑईल आणि नॅचरल गॅसकडे वळवला आहे. याचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या किमतीवर झालाय.
पुढे काय होणार?
केडिया यांच्या अंदाजानुसार, २०२६ मध्ये भारतात सोन्याच्या एकूण मागणीत घट होऊ शकते. याचं मुख्य कारण दागिन्यांच्या विक्रीतील संभाव्य घट हे आहे. सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार सुरूच राहतील. गुंतवणूकदारांनी कमोडिटी मार्केटमध्ये पैसे हळूहळू गुंतवावेत. सध्या बाजारातील अस्थिरता पाहता जोखीम अधिक आहे. सोन्या-चांदीची चाल आता 'सेफ हेवन' सारखी राहिलेली नाही. या धातूंमधील घसरण आणि उसळी आता स्मॉल कॅप शेअर्सप्रमाणे अनिश्चित झाली आहे.
Web Summary : Despite war, gold and silver prices have fallen sharply. Gold dropped ₹12,364, silver ₹37,765. Investment slowdown, strong dollar, and shifting focus to crude oil are factors. Volatility persists; cautious investment advised.
Web Summary : युद्ध के बावजूद, सोना और चांदी की कीमतें तेजी से गिरी हैं। सोना ₹12,364, चांदी ₹37,765 गिरी। निवेश में मंदी, मजबूत डॉलर और कच्चे तेल पर ध्यान केंद्रित करना कारण हैं। अस्थिरता बनी हुई है; सतर्क निवेश की सलाह।