Gold Silver Price 8 April: आज शेअर बाजारात तेजी आहे, तर सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ७७९ रुपयांनी घसरून ८८,३०६ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय. तर चांदी ८१२ रुपयांनी घसरून ८९,५८० रुपये प्रति किलो ग्रॅम झाली.
आयबीजेएनं जाहीर केलेल्या दरानुसार २३ कॅरेट सोन्याचा भाव आता ७७६ रुपयांनी कमी होऊन ८७,९५२ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ७१४ रुपयांनी घसरून ८०,८८८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. आज १८ कॅरेट सोन्याचा भाव ५८४ रुपयांनी कमी होऊन ६६,२३० रुपये झाला. एप्रिलमध्ये सोन्याच्या दरात ८१२ रुपयांची घसरण झाली होती, तर चांदी ११,३५८ रुपयांनी स्वस्त झाली होती.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) सराफा बाजाराचे दर जाहीर केलेत. यामध्ये जीएसटीचा समावेश नाही कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकेल. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्याला सायंकाळी ५ च्या सुमारास दर जारी केले जातात.
सोन्याचे दर ५०,००० रुपयांपर्यंत येऊ शकतं का?
सोन्या-चांदीची घसरण म्हणजे शेअर बाजारातील तोटा कमी करण्यासाठी सोन्याची विक्री सुरू आहे. प्रॉफिट बुकिंगमुळे २५० डॉलरची घसरण होईल, असं वाटत होतं, जे झालंय. दुसरीकडे, सोन्याला आधार देणारे घटक अजूनही वर्चस्व गाजवत आहेत. जसे भूराजकीय तणाव, डी-डॉलरायझेशन, मध्यवर्ती बँका आणि ईटीएफ खरेदी केले जात आहेत. शेअर बाजारात घसरण होत आहे. त्याचबरोबर महागाई आणि मंदीचीही भीती आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे धाव घेतील. आता जी घसरण होत आहे ती तात्पुरती आहे. बऱ्याच अंशी सोनं ८३००० ते ८४००० पर्यंत जाऊ शकतं. यानंतर ते वरच्या दिशेने धावू शकतं, असं अजय केडिया म्हणाले.