Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरूच, जाणून घ्या 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 16:00 IST

हा IBJA ने जाहीर केलेला सरासरी दर आहे. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्ज लावण्यात आलेला नाही.

सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. आज शुक्रवारी सराफा बाजारात सोने 106 रुपयांनी घसरून 50763 रुपयांवर आले आहे. तर चांदी 376 रुपयांनी स्वस्त झाली आहे. आपल्या शहरात हे 500 ते 2000 रुपयांनी महाग अथवा स्वस्तही विकले जाऊ शकते. कारण, हा IBJA ने जाहीर केलेला सरासरी दर आहे. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्ज लावण्यात आलेला नाही.

IBJA ने जारी केलेल्या दरानुसार, आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 50763 रुपयांपासून सुरू झाली. याचबरोबर चांदीचा दर 56710 रुपयांवर ओपन झाला. आता शुद्ध सोने अपल्या ऑल टाइम हाय 56254 रुपये प्रति 10 ग्रॅम पेक्षा 5491 रुपयांनी स्वस्त आहे. तसेच, चांदी आपल्या दोन वर्षांपूर्वीच्या हाय रेट 76008 रुपयांपेक्षा 19298 रुपये किलोने स्वस्त आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर - 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर 3 टक्के जीएसटीसह 52285 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 23 कॅरेट सोन्याचा आजचा दर जीएसटी सह 52076 रुपयांवर पोहोचला आहे. हा दर आज 50560 रुपये प्रति 10 ग्रॅम वर ओपन झाला. 22 कॅरेट सोन्याचा दर 46499 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आता 3 टक्के जीएसटीसह या सोन्याची किंमत 47893 रुपये आहे.18 कॅरेट सोन्याचा दर 38072 रुपयांवर आहे. जीएसटीसह याची किंमत आता 39214 रुपये झाली आहे.14 कॅरेट सोन्याचा दर आता 296966 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. जीएसटीसह हा दर 30585 रुपयांवर पोहोचला आहे.

टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूक