Join us

सोनं पुन्हा महागलं, चांदीचाही भाव वाढला; जाणून घ्या, असे आहेत नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 18:05 IST

राजधानी दिल्लीत सोमवारी सोन्याचा दर 161 रुपयांनी वाढून 52,638 रुपये प्रति तोळा म्हणजेच 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. तर चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे.

ठळक मुद्देदिल्लीत सोमवारी सोन्याचा दर 161 रुपयांनी वाढून 52,638 रुपये प्रति तोळा म्हणजेच 10 ग्रॅमवर पोहोचला आहे.चांदीचा दर 800 रुपयांनी वाढून 68,095 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.रिझर्व्ह बँकेने यावेळी सुवर्ण बॉन्डची किंमत 5,117 रुपये प्रति ग्रॅम एवढी ठेवली आहे.

नवी दिल्ली - एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार, रुपयाच्या घसरणीबोरोबरच राजधानी दिल्लीत सोमवारी सोन्याचा दर 161 रुपयांनी वाढून 52,638 रुपये प्रति तोळा म्हणजेच 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. तर चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. आता चांदीचा दर 800 रुपयांनी वाढून 68,095 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1,960 डॉलर प्रति औंसवर पोहोचले होते. तर चांदी 27.80 डॉलर प्रति औंसवर गेली होती.

यासंदर्भात बोलताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ अॅनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले आहे, की 'अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या दरात 161 रुपयांवी वाढला आहे.' स्थानिक शेअर बाजारातील पडझड आणि सोमवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने आता तो 73.60 प्रति डॉलरवर आला आहे.

देशातील स्थानिक सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा दर जवळपास 252 रुपयांनी घसरला होता. बाजारात रुपया मजबूत झाल्याने सोन्याचा दर 52,155 रुपये प्रति 10 ग्रामवर आला होता. तर चांदीच्या दरात तेजी दिसून आली होती. हा दर 462 रुपयांच्या वाढीसह 68,492 रुपये प्रति किलोवर पोहोचला होता. जागतिक बाजारात सोन्याची किंमत 1,949 अमेरिकन डॉलर प्रति औंसवर होती. तर चांदी 27.33 डॉलर प्रति औंसवर होती.

स्वस्तात सोनं विकत घेण्याची संधी! -गेल्या काही वर्षांपासून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार फिजिकल सोन्याची मागणी कमी करण्यासाठी एक खास योजना चालवत आहे. या योजनेला 'सुवर्ण बॉन्ड योजना', असे नाव देण्यात आले आहे. या योजनेंतर्गत केंद्रातील मोदी सरकार पुन्हा एकदा सोनं विकत आहे. सरकार बॉन्डच्या स्वरुपात सोन्याची विक्री करत असते. या सोन्याची किंमत रिझर्व्ह बँकेकडून निश्चित केली जाते. रिझर्व्ह बँक वेळोवेळी या सोन्याची किंमत जारी करत असते. ही किंमत बाजारातील फिजिकल सोन्याच्या तुलनेत कमी आणि सुरक्षित असते. 

यावेळी सुवर्ण बॉन्डची किंमत 5,117 रुपये प्रति ग्रॅम -रिझर्व्ह बँकेने यावेळी सुवर्ण बॉन्डची किंमत 5,117 रुपये प्रति ग्रॅम एवढी ठेवली आहे. सुवर्ण बॉन्डच्या खरेदीसाठी डिजिटल पद्धतीने पैसे जमा केल्यास प्रति ग्रॅम 50 रुपयांची सुटही मिळणार आहे. अशा गुंतवणूकदारांच्या बॉन्डची किंमत 5,067 रुपये प्रति ग्रॅम एवढी असेल. ही योजना 31 ऑगस्टला सुरू होऊन 4 सप्टेंबरला बंद होईल. याचाच अर्थ आपण या काळात सोन्याची खरेदी करू शकता. या योजनेत कमीतकमी एक ग्रॅम सोने विकत घेता येऊ शकते.

हे सोने विकत घेण्यासाठी आपल्याला आपल्या बँक, बीएसई, एनएसईची वेबसाईट अथवा पोस्ट ऑफीसशी संपर्क साधावा लागेल. येथून सुवर्ण बॉन्ड डिजिटलपद्धतीने विकत घेतले जाऊ शकतात. ही एक प्रकारची अत्यंत सुरक्षित गुंतवणूक आहे. कारण यात सोन्याच्या शुद्धतेची आणि सुरक्षिततेचीही चिंता नसते.

महत्त्वाच्या बातम्या -

डास माणसाचं रक्त का पितात? वैज्ञानिकांनी सांगितलं हैराण करणारं कारण

मुस्लिमांनी कोरोना लस टोचू नये, कारण हे 'हराम' आहे; वादग्रस्त इमामांचं वक्तव्य

घरमालक अन् भाडेकरूंच्या दादागिरीचे दिवस संपणार! मोदी सरकार एका महिन्यात 'हा' नवा कायदा आणणार

टॅग्स :सोनंचांदीव्यवसायदिल्लीकेंद्र सरकार