Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याचा भाव वधारला! १० ग्रॅमसाठी आता मोजावे लागणार इतके पैसे; चांदी २.६२ लाखांच्या पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 11:59 IST

Gold Silver Price : आज, देशभरातील प्रमुख महानगरांमध्ये सोन्याच्या 'स्पॉट' किमतींमध्ये किरकोळ बदल दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून, या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये सातत्याने चढ-उतार होत आहे.

Gold Silver Price : जागतिक बाजारातील तणाव आणि पश्चिम आशियातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर दिसून येत आहे. मंगळवारी वायदा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली. इराण आणि इस्रायलमधील संघर्ष तिसऱ्या आठवड्यात शिरल्याने आणि अमेरिकेने दिलेल्या इशाऱ्यांमुळे गुंतवणूकदार पुन्हा एकदा सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वळले आहेत.

वायदा बाजारात दरांची स्थितीमंगळवारी सकाळी १०:०१ वाजताच्या सुमारास मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्या-चांदीमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली.सोने (२ एप्रिल डिलिव्हरी) : सोन्याचा दर ०.८७% वाढून १,५७,०९८ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचला.चांदी (५ मे डिलिव्हरी): चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. चांदी २.२७% ने वधारून २,६२,३५० रुपये प्रति किलो वर व्यवहार करत होती.

महानगरांमधील आजचे सोन्याचे दर (प्रति ग्रॅम):देशातील प्रमुख शहरांमध्ये शुद्धतेनुसार सोन्याच्या किमतीत किरकोळ तफावत दिसून येत आहे.

शहर २४ कॅरेट (९९.९% शुद्धता)२२ कॅरेट (९१.६% शुद्धता)१८ कॅरेट (७५% शुद्धता)
दिल्ली१५,८७७१४,५५५११,९१२
मुंबई १५,८६२१४,५४०११,८९७
कोलकाता१५,८६२१४,५४०११,८९७
चेन्नई १५,९८२१४,६५०१२,३३०
बेंगळुरू १५,८६२१४,५४०११,८९७

जागतिक कारणांमुळे 'कामी' येत आहे सोनेआंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव ५,०२० डॉलर्स प्रति औंस वर पोहोचला आहे. जरी हे दर गेल्या महिन्यातील नीचांकी पातळीच्या जवळ असले, तरी मध्य-पूर्व आशियातील संकटामुळे पुन्हा एकदा तेजीचे संकेत मिळत आहेत. 

वाचा - टाटा पॉवर ते SBI पर्यंत, 'या' ५ शेअर्समध्ये दडलाय मोठा परतावा, ब्रोकरने दिली टार्गेट प्राईस

दरावर परिणाम करणारे मुख्य घटक

  • इराण-इस्रायल युद्ध : इराणने ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत सुविधांवरील हल्ले तीव्र केले आहेत.
  • ट्रम्प यांचा इशारा : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या तेल सुविधांवर थेट हल्ला करण्याचा इशारा दिली आहे.
  • महागाईची चिंता : ऊर्जेच्या (तेल-वायू) किमती वाढल्यामुळे महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे, परिणामी केंद्रीय बँकांकडून व्याजदराबाबत कडक धोरण अवलंबले जाण्याची शक्यता आहे.
English
हिंदी सारांश
Web Title : Gold prices soar! Silver crosses ₹2.62 lakh mark.

Web Summary : Global tensions and Middle East conflicts drive gold and silver prices up. Gold futures rose to ₹1,57,098 per 10 grams. Silver surged to ₹2,62,350 per kg amidst investor concerns over Iran-Israel tensions and potential US action.
टॅग्स :सोनंचांदीअमेरिका-इस्रायल-इराण वॉरइंधन टंचाई