Join us

सोने ३७ हजार २००, तर चांदी ४२,५००

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 02:09 IST

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण सुरूच असल्याने सोन्यामध्येही तेजी सुरूच

जळगाव : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण सुरूच असल्याने सोन्यामध्येही तेजी सुरूच आहे. सोन्याचे दर बुधवारी पुन्हा ७०० रुपये प्रती तोळ्याने वाढून ते ३७,२०० रुपये प्रती तोळा झाले. सोन्यासह चांदीही एकाच दिवसात एक हजार रुपये प्रती किलोने वधारून ४२,५०० रुपयांवर पोहचली.अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची झालेली घसरण तसेच रशिया आणि चीनने सोन्याची वाढविलेली खरेदी यामुळे सोन्याचे दर वाढत आहेत. मंगळवारी ३६,५०० रुपयांवर असलेल्या सोन्याचा दर बुधवारी ३७,२०० रुपयांवर पोहचला.मंगळवारी केवळ सोन्याच्या भावात वाढ झाली होती. मात्र ७ आॅगस्ट रोजी चांदीच्या भावात एक हजार रुपये प्रती किलोने वाढ झाली आहे. यापूर्वी २३ जुलै रोजी चांदीच्या भावात एकाच दिवसात दीड हजार रुपये प्रती किलोने वाढ होऊन चांदी ४० हजार रुपये प्रती किलोवरून ४१ हजार ५०० रुपयांवर पोहोचली होती. त्यानंर दोन आठवड्यांत पुन्हा एक हजार रुपयांनी चांदी वधारली आहे.

टॅग्स :सोनं