Go Digit Share Fall :शेअर बाजार सध्या प्रचंड चढउतारातून जात आहे. कंपन्यांनी जाहीर केलेल्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाही निकालांचा परिणाम शेअर बाजारावर स्पष्टपणे दिसत आहे. इथं दिग्गज कंपन्यांचेही शेअर्सही टिकले नाहीत. नुकतेच झोमॅटो कंपनीचे तिमाही निकाल जाहीर झाले आणि शेअर्सने सपाटून मार खाल्ला. मात्र, आता एका कंपनीच्या स्टॉक्सने तिमाही निकालापूर्वीच शरणागती पत्करली असल्याचे पाहायला मिळत आहे.
आपण विमा क्षेत्रातील कंपनी गो डिजिटबद्दल बोलत आहोत. तिमाही निकाल जाहीर होण्यापूर्वी या समभागात मोठी घसरण दिसून येत आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनीही या कंपनीत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
बाजार उघडताच स्टॉक कोसळलागो डिजिट इन्शुरन्स कंपनीने मे महिन्यात शेअर बाजारात प्रवेश केला आहे. आज डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. पण ते जाहीर होण्यापूर्वीच कंपनीचे शेअर्स कोसळले. बुधवारी सकाळी स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंगच्या सुरुवातीला गो डिजिट शेअर २९५.०५ रुपयांवर उघडला होता. परंतु, तो उघडताच शेअर घसरायला लागला आणि बातमी लिहिपर्यंत तो सुमारे ४ टक्क्यांहून अधिक घसरला होता. शेअर विभाजनाचा परिणाम कंपनीच्या बाजार भांडवलावरही दिसून आला. कंपनीचे मार्केट कॅप २५,९०० कोटी रुपयांपर्यंत घसरले.
विराट-अनुष्काची मोठी गुंतवणूक टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनेही गो डिजिटमध्ये मोठी रक्कम गुंतवली आहे. वृत्तानुसार, विराट कोहलीने फेब्रुवारी २०२० मध्ये कंपनीचे २,६६,६६७ शेअर्स ७५ रुपये प्रति शेअर या दराने खरेदी केले होते. विराट कोहलीसोबतच त्याची पत्नी अनुष्का शर्मानेही यामध्ये गुंतवणूक केली आहे. अनुष्काने कंपनीच्या शेअर्समध्ये प्रति शेअर ७५ रुपये या भावाने ५० लाख रुपये गुंतवून ६६,६६७ शेअर्स खरेदी केले आहेत.
कंपनीचे शेअर मे महिन्यात लिस्टगो डिजिट कंपनीचा IPO १५ मे २०२४ रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडण्यात आला होता. गुंतवणूकदारांनी १७ मे पर्यंत त्यात पैसे गुंतवले होते. यानंतर, २३ मे २०२४ रोजी ५ टक्के प्रीमियमसह कंपनीच्या शेअर्सची सूची करण्यात आली. कंपनीने IPO अंतर्गत समभागांसाठी २७२ रुपयांची वरची किंमत बँड सेट केली होती. त्याची नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) वर ५ टक्के प्रीमियमवर २८६ रुपये प्रति शेअर या दराने लिस्टिंग करण्यात आले होते. गो-डिजिट कंपनीच्या आयपीओचा आकार २,६१४.६५ कोटी रुपये होता.