Join us

Stock Market Today: ट्रम्प टॅरिफ बॉम्बनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ५३० अंकांनी आपटला; ऑटो-रियल्टीमध्ये विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 10:05 IST

Stock Market Today: देशांतर्गत शेअर बाजारात निफ्टीच्या मंथली एक्सपायरीचा दिवस आहे आणि बाजारासाठी खूप कमकुवत संकेत होते. अशा परिस्थितीत, सुरुवात देखील कमकुवत झाली आहे.

Stock Market Today: देशांतर्गत शेअर बाजारात निफ्टीच्या मंथली एक्सपायरीचा दिवस आहे आणि बाजारासाठी खूप कमकुवत संकेत होते. अशा परिस्थितीत, सुरुवात देखील कमकुवत झाली आहे. सेन्सेक्स ५३० अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. निफ्टीमध्येही सुमारे १८० अंकांची घसरण झाली. बँक निफ्टी ३०० अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. इंडिया VIX मध्ये ७% पेक्षा जास्त वाढ झाली होती. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्येही प्रत्येकी दीड टक्क्यांहून अधिक घसरण झाली.

सर्वात मोठी घसरण ऑटो आणि रिअल्टी क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये दिसून आली. मीडिया, पीएसयू बँका आणि कंझ्युमर ड्युरेबल्समध्येही मोठी घसरण दिसून आली. सर्व क्षेत्रीय निर्देशांक रेड झोनमध्ये व्यवहार करत होते. सेन्सेक्स ३० वरील फक्त ५ शेअर्स ग्रीन झोनमध्ये होते. इटरनल, पॉवर ग्रिड, टाटा स्टील, एचयूएल, आयटीसीमध्ये वाढ झाली. सर्वात मोठी घसरण भारती एअरटेल, रिलायन्स, टायटन आणि महिंद्रा अँड महिंद्रामध्ये झाली.

आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन

मागील बंदच्या तुलनेत, सेन्सेक्स ७८६ अंकांनी घसरून ८०,६९५ वर उघडला. निफ्टी २३५ अंकांनी घसरून २५,२४१ वर आणि बँक निफ्टी ४२२ अंकांनी घसरून ५५,७२८ वर उघडला. चलन बाजारात गेल्या पाच महिन्यांहून अधिक काळ घसरण पाहणारा रुपया २७ पैशांनी कमकुवत होऊन ८७.६९ वर उघडला.

खरं तर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५% कर लादल्याची बातमी चिंतेची बाब आहे, ज्यामुळे आज बाजारात मोठी घसरण दिसून येतेय. गिफ्ट निफ्टीमध्ये आधीच सुमारे २०० अंकांची घसरण दिसून येत होती.

टॅग्स :शेअर बाजारडोनाल्ड ट्रम्प