Join us
Daily Top 2Weekly Top 5

जर्मनीमध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा! मेकॅनिकपासून फायनान्सपर्यंत सर्व क्षेत्रांत संधी; १ कोटींपर्यंत मिळतोय पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 16:00 IST

Germany Labour Shortage : जर्मनी कुशल कामगारांच्या तीव्र तुटवड्याचा सामना करत असून, या संकटावर मात करण्यासाठी ते भारताकडे पाहत आहे.

Germany Labour Shortage : जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला जर्मनी सध्या 'डेमोग्राफिक क्राइसिस' म्हणजेच लोकसंख्येच्या गंभीर समस्येचा सामना करत आहे. अनुभवी कर्मचारी निवृत्त होत असताना, देशांतर्गत तरुण मनुष्यबळाची कमतरता जर्मनीला सतावत आहे. या संकटावर मात करण्यासाठी जर्मनीने आता भारताकडे आशेने पाहिले असून, भारतीय कुशल कामगारांसाठी आपल्या दारे सताड उघडली आहेत. विशेष म्हणजे, जर्मनीने भारतीय नागरिकांसाठीचा वार्षिक व्हिसा कोटा २०,००० वरून थेट ९०,००० पर्यंत वाढवला आहे.

जर्मनीसमोर २.८८ लाख कामगारांचे लक्ष्य'बर्टेल्समन फाउंडेशन'च्या अहवालानुसार, जर्मनीला आपली अर्थव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी दरवर्षी किमान २,८८,००० परदेशी कर्मचाऱ्यांची गरज आहे. जर ही गरज पूर्ण झाली नाही, तर २०४० पर्यंत जर्मनीचे कार्यबळ १० टक्क्यांनी कमी होऊ शकते. भारताकडे २५ वर्षांखालील ६० कोटी तरुणांची फौज असल्याने, जर्मनीसाठी भारत हा सर्वात मोठा 'लेबर सप्लायर' ठरत आहे.

कोणत्या क्षेत्रात आहेत संधी?जर्मनीमध्ये केवळ आयटीच नाही, तर शिक्षण, मॅन्युफॅक्चरिंग आणि सार्वजनिक सेवांमध्येही मोठे पॅकेज मिळत आहे.

क्षेत्र/नोकरीवार्षिक सरासरी पॅकेज (₹ मध्ये)
फायनान्स आणि इन्शुरन्स९८.२६ लाख
आयटी आणि टेलिकॉम९०.५८ लाख
ऊर्जा पुरवठा८९.६८ लाख 
तांत्रिक आणि वैज्ञानिक सेवा८६.३२ लाख
मॅन्युफॅक्चरिंग सेवा७१.७७ लाख
शिक्षण क्षेत्र६८.३३ लाख

जर्मनीमध्ये नोकरी मिळवण्याचा 'सिक्स-स्टेप' फॉर्म्युला

  1. मार्केट रिसर्च : जर्मनीचा बेरोजगारी दर ६% पेक्षा कमी आहे. तुमच्या क्षेत्रातील तिथे असलेली मागणी 'Monster' किंवा 'Indeed' सारख्या पोर्टल्सवर तपासा.
  2. जर्मन भाषेवर प्रभुत्व : इंग्रजी चालत असली तरी, जर्मन नोकरीसाठी B1-लेव्हल जर्मन भाषा येणे अनिवार्य आहे. मुलाखतीच्या ४-५ महिने आधी भाषा शिकण्यास सुरुवात करा.
  3. जर्मन स्टाईल रिझ्युमे : तुमचा रिझ्युमे 'ATS-फ्रेंडली' आणि जर्मन मानकांनुसार असावा.
  4. अर्ज प्रक्रिया : 'Arbeitsagentur' आणि 'JobMESH' सारख्या अधिकृत जर्मन पोर्टल्सवर नोंदणी करा. लिंकडइनवर जर्मन रिक्रूटर्सशी संपर्क साधा.
  5. ऑनलाइन मुलाखत : निवड झाल्यास तुमची व्हिडिओ मुलाखत घेतली जाईल. यात प्रामाणिकपणा आणि तांत्रिक कौशल्याला जास्त महत्त्व दिले जाते.

वाचा - शेअर बाजारातील पडझडीत DMart च्या दमानींच्या 'या' शेअरची कमाल! आतापर्यंत १७००% परतावा

  1. व्हिसा अर्ज : ऑफर लेटर मिळाल्यावर 'VFS Global' द्वारे वर्क व्हिसासाठी अर्ज करा. जर नोकरी नसेल, तर तुम्ही 'जॉब सीकर व्हिसा' घेऊन १ वर्षासाठी जर्मनीला जाऊ शकता. 
टॅग्स :जर्मनीनोकरीशिक्षण