Join us

‘या’ कंपनीला वर्षभरात १५४ कोटींचा नफा; ३०० टक्के लाभांश जाहीर, गुंवतणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 15:34 IST

वित्तीय सेवा पुरवणाऱ्या कंपनीने या आर्थिक वर्षासाठी ३०० टक्के लाभांश जाहीर केला आहे.

नवी दिल्ली: आताच्या घडीला शेअर मार्केटमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. असे असले तरी काही कंपन्या दमदार कामगिरी करत मोठा नफा कमवत असल्याचे दिसत आहेत. यातील एक नाव म्हणजे वित्तीय सेवा पुरवणारी कंपनी जिओजित. या कंपनीला गत आर्थिक वर्षांत १५४ कोटींचा नफा झाला असून, या कंपनीने गुंतवणूकदारांसाठी ३०० टक्के लाभांश जाहीर केला आहे. 

जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसने ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या वर्षात १५४ कोटी रुपयांचा नफा नोंदविला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा नफ्यात २१ टक्क्यांनी वाढला. कंपनीचा एकत्रित महसूल १७ टक्क्याने वाढून ५०१ कोटी झाला आहे. या कालावधीसाठी करपूर्व नफा २२ टक्क्याने वाढून २०२ कोटी रुपये झाला आहे. यानिमित्ताने जिओजितने २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी ३०० टक्के लाभांश जाहीर केला आहे. 

कंपनीने ९४००० नवीन ग्राहक जोडले

जिओजितच्या भागधारकांना प्रति इक्विटी शेअर ३ रुपये अंतिम लाभांश घोषित केला. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये कंपनीने ९४००० नवीन ग्राहक जोडले आणि एकूण ग्राहकांची संख्या १२ लाख झाली. ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षातील कंपनीची एकूण आर्थिक कामगिरी मागील वर्षाच्या तुलनेत २१ टक्क्यांनी २३६ कोटी रुपयांनी वाढून सर्वांगीण सुधारणा दर्शवते. कंपनीच्या संचालक मंडळाने २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी ३०० टक्के लाभांश देण्याची घोषणा केली. प्रत्येकी १ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअरवर ३ रुपये अंतिम लाभांश देण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या आर्थिक वर्षात जिओजितची कामगिरी सर्वोत्कृष्ट होती आणि हे बाजारातील वाढत्या किरकोळ सहभागामुळे होते आणि आमच्या ग्राहकांची संपत्ती निर्माण करण्यात मदत करण्यावर आमचा भर होता. आमच्या ग्राहकांच्या दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी आम्ही आमचे प्लॅटफॉर्म आणि उत्पादने वाढवत राहू, असे जिओजितचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) सीजे जॉर्ज यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :शेअर बाजार