कोरोनाच्या महासाथीचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला (Indian Economy) बसला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला गेल्या चाळीस वर्षांतील सर्वात मोठा फटका बसला असून आर्थिक वर्ष २०२१ मध्ये भारताच्या जीडीपीमध्ये ७.३ टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या वर्षाच्या चौथ्या तिमाहिमध्ये मात्र जीडीपीमध्ये १.६ टक्क्यांची वाढ झाली. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपूर्वी भारताची अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर येण्याच्या मर्गावर होती असे संकेत यावरून मिळत आहेत.२०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था सकारात्मक स्थितीत आली आहे ही थोडी दिलासादायक बाब आहे. जानेवारी ते मार्च २०२१ च्या चौथ्या तिमाहीत वाढीचा दर १.६ टक्के इतका नोंदवला गेला. कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यस्थेला गेल्या वर्षी मोठा फटका बसला होता. २०२०-२१ या आर्थिक वर्षात अर्थव्यस्थेत सकारात्मक सुधारणा होतील अशी अपेक्षा होती. आर्थिक वर्ष २०१९ देशाचा जीडीपी वाढीचा दर ४ टक्के इतका होता. परंतु तो गेल्या ११ वर्षांच्या तुलनेत कमी होता. उत्पादन आणि बांधकाम क्षेत्रावर झालेल्या परिणामाचा फटका अर्थव्यवस्थेला बसला होता.NSO च्या अंदाजापेक्षा कमी घसरणजीडीपी २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या जानेवारी ते मार्च या कालावधीत ३ टक्क्यांनी वाढला होता. एनएसओकडून (National Statistics Office) हा डेटा जारी करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात जारी करण्यात आलेल्या राष्ट्रीय अकाऊंट्सच्या पहिल्या अॅडव्हान्स्ड एस्टिमेट २०२०-२१ मध्ये जीडीपीत ७.७ टक्क्यांच्या घसरणीचा अंदाज वर्तवला होता. त्यानंतर आपल्या दुसऱ्या अंदाजात जीडीपीत ८ टक्क्यांची घसरण होणार असल्याचं म्हटलं होतं.
India FY21 GDP: अर्थव्यवस्थेला ४० वर्षांतील सर्वात मोठा फटका, आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जीडीपी ७.३ टक्क्यांनी घसरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 19:51 IST
गेल्या आर्थिक वर्षादरम्यान अर्थव्यवस्थेला कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर मोठा फटका बसला होता. आर्थिक वर्ष २०२१-२१ च्या चौथ्या तिमाहीत जीडीपी १.६ टक्क्यांनी वाढला आहे.
India FY21 GDP: अर्थव्यवस्थेला ४० वर्षांतील सर्वात मोठा फटका, आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जीडीपी ७.३ टक्क्यांनी घसरला
ठळक मुद्देगेल्या आर्थिक वर्षादरम्यान अर्थव्यवस्थेला कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर मोठा फटका बसला होता. आर्थिक वर्ष २०२१-२१ च्या चौथ्या तिमाहीत जीडीपी १.६ टक्क्यांनी वाढला आहे.