रेमंड समूहाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती गौतम सिंघानिया मालदीवमध्ये एका भीषण स्पीडबोट अपघातात जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी पहाटे १:१५ च्या सुमारास मालदीवमधील 'व्ही फेलिधू' बेटाजवळ घडला. सिंघानिया यांना तातडीने रेस्क्यू करून उपचारांसाठी मुंबईत एअरलिफ्ट करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकूण ७ पर्यटकांना घेऊन जाणारी एक स्पीडबोट समुद्रातील लाटांमुळे अचानक उलटली. या बोटीवर ५ भारतीय, १ ब्रिटीश आणि १ रशियन नागरिक होते. अपघातानंतर ५ लोक समुद्रात फेकले गेले. या अपघातात त्यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि भारताचे दिग्गज रॅली ड्रायव्हर हरी सिंह बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.
सिंघानिया यांची प्रकृती आणि उपचारगौतम सिंघानिया यांना या अपघातात किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. सिंघानिया यांच्या प्रवक्त्याने सांगितले की, ते सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून लवकरच घरी परततील.
प्रसिद्ध रॅली ड्रायव्हर हरी सिंह बेपत्ताया अपघातातील सर्वात मोठी चिंता म्हणजे भारतातील दिग्गज रॅली ड्रायव्हर हरी सिंह आणि आणखी एक भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. मालदीव कोस्ट गार्ड आणि स्थानिक प्रशासनाकडून त्यांचा शोध घेण्यासाठी समुद्रात मोठी मोहीम राबवली जात आहे.कोण आहेत हरी सिंह?
देशातील सर्वात यशस्वी रॅली ड्रायव्हर्समध्ये हरी सिंह यांचे नाव आदराने घेतले जाते. 'द फ्लाइंग सिख' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरी सिंह यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मोठे टप्पे गाठले आहेत. १९९० च्या दशकात त्यांनी सलग ५ वेळा इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियनशिप (INRC) जिंकण्याचा विक्रम केला आहे. पहिली 'एशिया झोन रॅली चॅम्पियनशिप' जिंकण्याचा मानही त्यांच्याकडे जातो. त्यांनी जेके टायर मोटरस्पोर्टचे हेड ऑफ ऑपरेशन्स आणि मर्सिडीज-बेंज इंडियाचे चीफ इंस्ट्रक्टर म्हणूनही काम पाहिले आहे.
Web Summary : Gautam Singhania was injured in a Maldives speedboat accident. Five others were rescued. Rally driver Hari Singh is missing and being searched. Singhania is hospitalized in Mumbai and stable.
Web Summary : गौतम सिंघानिया मालदीव में एक स्पीड बोट दुर्घटना में घायल हो गए। पांच अन्य को बचाया गया। रैली ड्राइवर हरि सिंह लापता हैं और उनकी खोज जारी है। सिंघानिया मुंबई के अस्पताल में भर्ती हैं और स्थिर हैं।