Join us  

Gautam Adani Shares Big Fall: अदानींसाठी काळा दिवस! 6 पैकी 5 कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, लोअर सर्किटची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 10:40 AM

Gautam Adani Shares falling: आज शेअर बाजार उघडताच एका ट्विटने खळबळ उडवून दिली. शेअर बाजारातील आजवरच सर्वात मोठा हर्षद मेहता स्कॅम उघड करणाऱ्या सुचेता दलाल यांनी हे ट्विट केले होते.

Gautam Adani Shares Big Fall: आजचा दिवस भारताचे आणि आशियाचे दुसरे सर्वात श्रीमंत बनलेले व्यक्ती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यासाठी काळ्या दिवसासारखाच असणार आहे. त्यांच्या कंपन्यांचे शेअर पत्त्यांच्या इमल्यासारखे धडाधड कोसळू लागले आहेत. त्यांच्या सर्वच कंपन्यांचे शेअर लाल निशान्यावर असून 6 पैकी 5 कंपन्यांच्या शेअर्सवर लोअर सर्किट लावण्यात आले आहे. (National Securities Depository Ltd (NSDL) has frozen the accounts of three foreign funds — Albula Investment Fund, Cresta Fund and APMS Investment Fund .)

आज शेअर बाजार उघडताच एका ट्विटने खळबळ उडवून दिली. शेअर बाजारातील आजवरच सर्वात मोठा हर्षद मेहता स्कॅम उघड करणाऱ्या सुचेता दलाल यांनी हे ट्विट केले होते. यानंतर अदानींच्या कंपनीचे शेअर धडाधड कोसळू लागले. पहिल्यांदा अदानी एंटरप्राइजला लोअर सर्किट लागले, नंतर अदानी ग्रीन्स आणि त्यांच्या कंपन्यांची रांगच लागली. नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेडने (NSDL) तीन परदेशी फंडवर मोठी कारवाई केली. यामध्ये Albula Investment Fund, Cresta Fund आणि APMS Investment Fund यांचा समावेश आहे. ही कारवाई 30 मेच्या दरम्यानेच केल्याचे सांगितले जात आहे. या फंडकडे अदानींच्या 4 कंपन्यांचे 43,500 कोटींहून अधिक रुपयांचे शेअर आहेत. या फंडचे अकाऊंट फ्रीज करण्यात आले आहे. (Accounts of 3 FPIs owning Adani Group shares frozen)

हर्षद मेहताचा 'स्कॅम' उघड करणाऱ्या सुचेता दलाल यांचं धक्कादायक ट्विट अन् शेअर बाजार गडगडला!

  • अदानी एंटरप्राइज - बाजार उघडताच या शेअरमध्ये 10 टक्क्यांची घसरण झाली. लोअर सर्किट लागल्यावर काही वेळाने पुन्हा शेअर सुरा झाला तेव्हा पुन्हा 5 टक्क्यांची घसरण झाली आणि पुन्हा लोअर सर्किट लागले. 
  • अदानी ग्रीन्स - बाजार उघडताच अदानी ग्रीन्सचे शेअर 5 टक्क्यांनी घसरले. यानंतर लोअर सर्किट लागले. 
  • अदानी टोटल गॅस - अदानींची ही कंपनीदेखील वाचू शकली नाही. 5 टक्क्यांची घसरण होत लोअर सर्किट लागले. 
  • अदानी ट्रांसमिशन, अदानी पावर- शेअर बाजार उघडताच 5 टक्क्यांची घसरण होत लोअर सर्किट लागले. 
  • अदानी पोर्ट्स - अदानी पोर्टच्या शेअरमध्ये बाजार उघडताच 17 टक्क्यांची घसरण नोंदविली गेली.  
टॅग्स :अदानीशेअर बाजार