Join us

गौतम अदानी Adani Wilmar मधील ४४ टक्के भागीदारी विकण्याच्या तयारीत? का घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 14:33 IST

अदानी समुहानं विल्मर इंटरनॅशनलसोबत हे कंझ्युमर-स्टेपल जॉईंट व्हेन्चर सुरू केले होते.

अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस (Adani Enterprises) ही समूहाचीच कंपनी अदानी विल्मरमधील (Adani Wilmar) हिस्सा कमी करणार आहे. अदानी समुहानं विल्मर इंटरनॅशनलसोबत हे कंझ्युमर-स्टेपल जॉईंट व्हेन्चर सुरू केले होते. आपल्या मूळ व्यवसायासाठी भांडवल ठेवता यावं यासाठी आता अदानी एंटरप्रायझेसला या कंपनीतील आपली हिस्सेदारी कमी करायची आहे. 

वृत्तसंस्था ब्लूमबर्गनं सूत्रांच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलंय. मिळालेल्या माहितीनुसार, गौतम अदानी यांच्या अदानी समूहाची ही कंपनी काही महिन्यांपासून अदानी विल्मारमधील 44 टक्के स्टेक विकण्याचा विचार करत आहे. सध्याच्या शेअरच्या किमतीनुसार, अदानी विल्मरमधील समूहाचं मूल्य सुमारे 270 कोटी डॉलर्स आहे. याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. दुसरीकडे, समूह स्पेक्युलेशन्सवर कोणतीही प्रतिक्रिया देत नसल्याचं अदानी समूहाच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं. विल्मरच्या प्रतिनिधींनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

गेल्या वर्षी आलेला आयपीओअदानी विल्मरनं गेल्या वर्षी 2022 मध्ये आयपीओद्वारे 3600 कोटी रुपये उभे केले होते. या आयपीओ अंतर्गत, गुंतवणूकदारांना 230 रुपयांना शेअर्स जारी करण्यात आले आणि कर्मचाऱ्यांना 21 रुपयांची सूट मिळाली. अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चनं केलेल्या आरोपांनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. परंतु नंतर त्यात रिकव्हरी दिसून आली. 8 ऑगस्ट रोजी कंपनीचे शेअर्स 393.05 रुपयांवर होते. गेल्या वर्षी 23 सप्टेंबर 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 841.90 रुपयांच्या वर्षाच्या उच्चांकी स्तरावर होते.

टॅग्स :अदानीगौतम अदानीव्यवसाय