Join us

धारावीनंतर आणखी एक मोठा प्रकल्प अदानी समूहाकडे; ३६,००० कोटींची लागली बोली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 12:28 IST

Adani Group Wins Big: गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने मुंबईतील एका मोठ्या गृहनिर्माण-विकास प्रकल्पाची बोली जिंकली आहे. समूहाची अदानी प्रॉपर्टीज लिमिटेड हा प्रकल्प पूर्ण करणार आहे.

Adani Group Wins Big: देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाला मुंबईतील आणखी एक मोठा प्रकल्प मिळवण्यात यश मिळाले आहे. यापूर्वी धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाला मिळाला आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या कंपनीने मुंबईतील एका मोठ्या प्रकल्पाची बोली जिंकली असून हा प्रकल्प ३६,००० कोटी रुपयांचा आहे. हा मुंबईतील सर्वात मोठ्या गृहनिर्माण-विकास प्रकल्पांपैकी एक असून अदानी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडद्वारे पूर्ण केला जाईल.

अदानी प्रॉपर्टीजकडून सर्वाधिक बोलीअदानी समूहाची कंपनी अदानी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडला मोतीलाल नगर I, II, III, गोरेगाव पश्चिम, मुंबई येथे १४३ एकरमध्ये पसरलेल्या गृहनिर्माण प्रकल्पाचा पुनर्विकास करणार आहे. अदानी प्रॉपर्टीजने या प्रकल्पासाठी ३६,००० कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावली आहे. या अंतर्गत ३.९७ लाख चौरस मीटरचे बिल्ट-अप क्षेत्र बांधले जाणार आहे. या प्रकल्पाच्या वाटपाचे पत्र (LoA) लवकरच जारी केले जाण्याची अपेक्षा आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचा हिरवा कंदीलगेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाला (म्हाडा) मोतीलाल नगरचा बांधकाम आणि विकास एजन्सी (C&DA) मार्फत विकास करण्याची परवानगी दिली. यानंतर राज्य सरकारने हा विशेष प्रकल्प म्हणून घोषित केला असून, तो एजन्सीमार्फत काम करत असला तरी तो म्हाडाच्या ताब्यात आहे. प्रकल्पांतर्गत म्हाडा अंतर्गत ३,३७२ निवासी युनिट्स, ३२८ पात्र व्यावसायिक युनिट्स आणि १,६०० पात्र झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. येथील सर्व बेकायदा बांधकामे हटवली जाणार आहेत.

अदानी समूहाची दुसरी मोठी पुनर्विकास योजनाधारावी पुनर्विकास प्रकल्पानंतरचा दुसरा सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या मुंबईतील मोतीलाल नगर येथील ३६,००० कोटी रुपयांच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानी समूह सर्वाधिक बोली लावणारा ठरला. गौतम अदानी यांनी ५००० हजार कोटींची बोली लावून मुंबईतील झोपडपट्टी क्षेत्र धारावीचा प्रकल्प जिंकला होता. त्याच वेळी अदानी प्रॉपर्टीज ही नवीन कंपनी स्थापन केली होती. आता या कंपनीने दुसरी मोठी बोली जिंकली आहे.

टॅग्स :गौतम अदानीअदानीमुंबई