Join us

गौतम अदानी यांच्या निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम; अदानी ग्रुपने दिली महत्वाची माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 21:41 IST

Adani Retirement Plan: गौतम अदानी 2030 मध्ये व्यवसायातून निवृत्ती घेणार असल्याचा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला होता.

Adani Retirement Plan: अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या निवृत्तीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. नुकताच एका मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की, गौतम अदानी 2030 पर्यंत निवृत्ती घेतील आणि त्यांनी आपला उत्तराधिकारीदेखील ठरवला आहे. पण, आता अदानी समूहाने याबाबत स्पष्टीकरण दिले असून, गौतम अदानी यांच्या निवृत्तीबाबत महत्वाची माहिती दिली आहे. 

अद्याप निवृत्तीवर कोणताही निर्णय नाही...नुकत्याच प्रकाशित झालेल्या ब्लूमबर्गच्या अहवालात दावा करण्यात आला होता की, गौतम अदानी 70 वर्षांचे झाल्यावर समूहाचे अध्यक्षपद सोडातील. तसेच, आपला व्यवसाय दोन मुले करण-जीत आणि पुतणे प्रणव-सागर यांच्या नावावर करतील. पण, आता अदानी समूहाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. आमचा व्यवसाय एका कौटुंबिक ट्रस्ट अंतर्गत चालवला जातो, यामध्ये सर्वजण समान भागधारक आहेत. गौतम अदानी यांनी केवळ व्यवसायाला पुढे नेण्याबाबत त्यांचे मत मांडले होते. त्यांच्या निवृत्तीबाबत सध्या कोणतीही चर्चा होऊ नये, असे समूहाकडून स्पष्टीकरण आले आहे.

सध्या उत्तराधिकाऱ्याचा प्रश्नच उद्भवत नाहीउत्तराधिकारी ठरवण्याचा सध्या प्रश्नच उद्भवत नसल्याचे अदानी समूहाने सांगितले. ही एक नियमित प्रक्रिया असते. योग्य वेळ आल्यावर याबाबत निर्णय घेतला जाईल. गौतम अदानी यांनी मुलाखतीत आपल्या भविष्यातील योजनांबाबत विचार मांडले होते, त्यात आपल्या निवृत्तीबाबत कोणतेही भाष्य केले नाही. त्यांनी फक्त आपली दोन मुले आणि पुतणे कोणता व्यवसाय सांभाळतील, याबाबत माहिती दिली होती. त्यामुळे गौतम अदानी यांच्या निवृत्तीबाबत आणि उत्तराधिकारी ठरवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही समूहाकडून सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :गौतम अदानीअदानीव्यवसाय