Join us
Daily Top 2Weekly Top 5

गौतम अदानी पुन्हा बनले भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती, मुकेश अंबानी यांना टाकले मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 10:09 IST

अदानी समूहाच्या समभागांत जबरदस्त तेजी आल्यामुळे अदानी हे श्रीमंतांच्या जागतिक यादीत १२व्या स्थानी आले आहेत. अंबानी हे १३व्या स्थानी आहेत. 

मुंबई : अदानी उद्योग समूहाचे चेअरमन गौतम अदानी हे रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांना मागे टाकून पुन्हा भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. अदानी समूहाच्या समभागांत जबरदस्त तेजी आल्यामुळे अदानी हे श्रीमंतांच्या जागतिक यादीत १२व्या स्थानी आले आहेत. अंबानी हे १३व्या स्थानी आहेत. 

उद्योगपती     संपत्तीइलॉन मस्क     १८.३१ जेफ बेझोस     १४.०६ बर्नार्ड अरनॉल्ट     १३.९८ बिल गेट्स     ११.४८ स्टिव्ह बाल्मर     १०.६५ मार्क झुकरबर्ग     १०.४८ लॅरी पेज     १०.३२ वॉरेन बफे     १०.१५ लॅरि एलिसन     ९.९९ सर्गी ब्रिन     ९.४७ कार्लोस स्लिम     ८.४९

त्यानुसार, गौतम अदानी यांची संपत्ती १ वर्षात १.०८ लाख कोटी रुपयांनी वाढून ८.१२ लाख कोटी रुपयांवर पोहोचली. याच काळात मुकेश अंबानी यांची संपत्ती ५ हजार कोटी रुपयांनी वाढून ८.०७ लाख कोटी रुपये झाली आहे.

टॅग्स :गौतम अदानीमुकेश अंबानीशेअर बाजार