Gauri Khan Tori Restaurant Menu: बॉलीवूडमध्ये शाहरुख खानचं कुटुंब नेहमीच चर्चेत असते. पण आज आपण त्याची पत्नी गौरी खान यांच्याबद्दल बोलूया. गौरी केवळ प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर नाही, तर ती शाहरुखचे चित्रपटही प्रोड्यूस करते. याशिवाय, तिनं मुंबईत आपलं स्वतःचे रेस्टॉरंट उघडलं आहे, ज्याचं नाव टोरी (Tori) आहे.
हे एक पॅन एशियन रेस्टॉरंट आहे, म्हणजे आशियातील वेगवेगळ्या देशांतील फूड येथे मिळतं. विदेशात ज्या डिशेस फेमस आहेत, त्या सर्व येथे उपलब्ध आहेत. पण आता त्यांचा मेनू व्हायरल झाला आहे. किमती पाहून तर प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आहे. एक लॅम्ब चॉप ३७०० रुपयांना, ८ पीस मोमोज १५०० रुपयांना, व्हेज रोल ९५० रुपयांना आणि मॅश पोटॅटोची किंमत ९०० रुपये आहे.
गौरी खानच्या रेस्टॉरंटमधील डिशची किंमत
गौरी खानचं हे रेस्टॉरंट मुंबईतील खार परिसरात आहे. येथे पकोडे, सॅलड, सी फूड सर्व काही आहे. पण नावं थोडी वेगळी आहेत, त्यामुळे ते प्रसिद्ध झालं आहे.
प्रथम मोमोजबद्दल बोलूया. टोरी व्हेज ग्योजा (Tori Veg Gyoza), जे जपानी स्टाईलचे व्हेज मोमोज आहेत, ते १५०० रुपयांचे आहेत. नंतर स्टीम राईस रोल (Steam Rice Roll), एक व्हेज रोल, ९५० रुपयांचा आहे. समर व्हेजिटेबल नूडल (Summer Vegetable Noodle) आणि ट्रफल एडामे (Truffle Edamame) देखील ९५० रुपयांना मिळेल. सॅलडची किंमत ५०० रुपयांपासून सुरू होते. सर्वात लोकप्रिय साशिमी सॅलड (Sashimi Salad) आहे, जो सॅल्मन आणि टूना माशापासून बनतो. तो ११०० रुपयांचा आहे. एनोकी मशरूम टेंपुरा (Enoki Mushroom Tempura) ६०० रुपयांना आणि कमळाच्या मुळाची डिश आहे ती ७५० रुपयांची आहे.
नॉन-व्हेज डिशची ही आहे किंमत
आता नॉन-व्हेज डिशेसची किंमत पाहूया. सर्वात महागड्या डिशेस येथे आहेत. याकिनिकु एनझेड लॅम्ब चॉप (Yakiniku NZ Lamb Chop) ३८०० रुपयांच्या दरम्यान आहे. मग मिसो ब्लॅक कॉड (Miso Black Cod) ४७०० रुपयांना आहे. ब्लॅक कॉड ही जपानी फिश आहे, जी मिसो सॉससोबत दिली जाते.
याव्यतिरिक्त, गौरीच्या रेस्टॉरंटमध्ये एनोकी मशरूम टेंपुरा ६०० रुपयांना सर्व्ह केला जातो. तर, सिंगापूर मिरचीसोबत लोटस रूट ७५० रुपयांना सर्व्ह केला जातो. इतकेच नाही, रेस्टॉरंटमध्ये चिकन यकीटोरी (Chicken Yakitori) ८०० रुपयांना मिळते. याशिवाय एनजी लॅम्ब चॉप आणि मिसो ब्लॅक कोड अनुक्रमे ३८०० आणि ४५०० रुपयांना मिळतील. हे सर्व विदेशी फूड आहे, त्यामुळे किमती जास्त आहेत. त्यांचे हे रेस्टॉरंट पॅन एशियन आहे, त्यामुळे विदेशात फिरल्यासारखे वाटतं. या ठिकाणी लक्झरी डायनिंगचा अनुभव मिळतो.
Web Summary : Gauri Khan's Mumbai restaurant, Tori, features a Pan-Asian menu with dishes like momos for ₹1500 and lamb chops for ₹3700. Prices for even simple dishes like mashed potatoes are surprisingly high, sparking online discussion.
Web Summary : गौरी खान के मुंबई स्थित रेस्टोरेंट, टोरी में, ₹1500 के मोमोज और ₹3700 के लैम्ब चॉप जैसे व्यंजनों के साथ एक पैन-एशियाई मेनू है। मैश किए हुए आलू जैसे साधारण व्यंजनों की कीमतें भी आश्चर्यजनक रूप से अधिक हैं, जिससे ऑनलाइन चर्चा छिड़ गई है।