Gaudium IVF IPO: भारतीय शेअर बाजारात पहिल्यांदाच फर्टिलिटी सर्व्हिसेस पुरवणारी एखादी कंपनी लिस्ट होण्याच्या तयारीत आहे. यासाठी 'गौडियम आयव्हीएफ'ने बाजार नियामक सेबीकडे (SEBI) आपल्या आयपीओचा रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (RHP) दाखल केलाय. या माहितीनुसार, हा आयपीओ गुंतवणुकीसाठी पुढील आठवड्यात २० फेब्रुवारी रोजी खुला होईल, तर अँकर गुंतवणूकदारांसाठी हा इश्यू १८ फेब्रुवारी रोजी खुला केला जाईल. या आयपीओअंतर्गत नवीन शेअर्स जारी केले जातील आणि 'ऑफर फॉर सेल'च्या (OFS) माध्यमातून विद्यमान भागधारक आपला हिस्सा कमी करतील.
आयपीओच्या डिटेल्स
गौडियम आयव्हीएफ अँड वुमन हेल्थनं गेल्या वर्षी सप्टेंबर २०२५ मध्ये आयपीओचा मसुदा दाखल केला होता, ज्याला जानेवारी २०२६ मध्ये मंजुरी मिळाली आहे. या आयपीओच्या यशानंतर शेअर बाजारात लिस्ट होणारी ही पहिलीच आयव्हीएफ कंपनी ठरेल. यानंतर 'इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटल' देखील लिस्टिंगच्या तयारीत असून त्यांनी जुलै २०२५ मध्येच गोपनीयरीत्या आपला मसुदा सेबीकडे सादर केला आहे.
इंडोनेशियातून टाटा, महिंद्राला हजारो गाड्यांची ऑर्डर का? कशासाठी वापरणार, नेमका प्लॅन काय?
गौडियम आयव्हीएफच्या आयपीओमध्ये शेअर्सचं वाटप २५ फेब्रुवारीला अंतिम होईल, तर २७ फेब्रुवारीला बीएसई (BSE) आणि एनएसई (NSE) वर कंपनीची नोंदणी होईल. या प्रक्रियेअंतर्गत १.१३ कोटी नवीन शेअर्स जारी केले जातील, तर कंपनीच्या प्रवर्तक आणि संस्थापिका डॉ. मणिका खन्ना ऑफर फॉर सेलद्वारे ९४.९३ लाख शेअर्सची विक्री करतील. सध्या त्यांचा कंपनीत ९९.३२% हिस्सा असून, या विक्रींनंतर तो ७०.७३% वर येईल.
निधीचा वापर आणि कंपनीची आर्थिक स्थिती
आयपीओद्वारे उभारल्या जाणाऱ्या निधीच्या वापराबाबत सांगायचे तर, ऑफर फॉर सेलद्वारे मिळणारे पैसे डॉ. मणिका खन्ना यांना मिळतील. नवीन शेअर्सद्वारे मिळणाऱ्या निधीपैकी ५० कोटी रुपये नवीन आयव्हीएफ सेंटर्स उभारण्यासाठी, तर २० कोटी रुपये कर्ज फेडण्यासाठी वापरले जातील. सप्टेंबर २०२५ अखेर कंपनीवर २२.५ कोटी रुपयांचे कर्ज होतं. २०१५ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी 'हब-अँड-स्पोक' मॉडेलद्वारे देशात ३० हून अधिक ठिकाणी कार्यरत आहे. कंपनीची सध्या ७ मुख्य केंद्रे दिल्ली, मुंबई, लुधियाना, जम्मू-काश्मीर, बिहार आणि बंगळुरू येथे आहेत, तर २८ 'स्पोक्स' आहेत. कंपनीनं देशभरात १९ नवीन आयव्हीएफ केंद्रे सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला असून त्यावर येत्या तीन आर्थिक वर्षांत ५० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
कंपनीचा नफा आणि महसुलातील वाढ
कंपनीच्या आर्थिक प्रगतीवर नजर टाकल्यास, चालू आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या सहामाहीत गौडियम आयव्हीएफनं ४९.५ कोटी रुपयांचा महसूल आणि १२.५ कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. गेल्या आर्थिक वर्ष २०२५ मध्ये कंपनीचा नफा वार्षिक ८५.४% च्या वेगानं वाढून १९.१ कोटी रुपयांवर पोहोचला होता, तर महसुलात ४७.७% ची वाढ होऊन तो ७०.७ कोटी रुपये इतका नोंदवला गेला. आरोग्य क्षेत्रातील या नवीन व्यवसायाची बाजारातील एन्ट्री गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरू शकते.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Gaudium IVF is set to launch India's first fertility services IPO, opening February 20th. The IPO includes fresh shares and an offer for sale by founder Dr. Manika Khanna. Funds will support new IVF centers and debt reduction. The company reported strong revenue and profit growth.
Web Summary : गॉडियम आईवीएफ 20 फरवरी को भारत का पहला फर्टिलिटी सर्विसेज आईपीओ लॉन्च करने के लिए तैयार है। आईपीओ में नए शेयर और संस्थापक डॉ. मणिका खन्ना द्वारा बिक्री की पेशकश शामिल है। धन का उपयोग नए आईवीएफ केंद्रों और ऋण कटौती का समर्थन करेगा। कंपनी ने राजस्व और लाभ में मजबूत वृद्धि दर्ज की।