Union Budget
Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अर्थसंकल्पापूर्वी मोठा झटका! गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ; आता कितीला मिळणार? पाहा नवे दर

अर्थसंकल्पापूर्वी मोठा झटका! गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ; आता कितीला मिळणार? पाहा नवे दर

Gas Cylinder Price Hike: आज १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच ऑइल मार्केटिंग कंपन्या इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमनं ग्राहकांना महागाईचा झटका दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 08:38 IST2026-02-01T08:38:40+5:302026-02-01T08:38:40+5:30

Gas Cylinder Price Hike: आज १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच ऑइल मार्केटिंग कंपन्या इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमनं ग्राहकांना महागाईचा झटका दिला आहे.

Gas Cylinder Price Hike Big shock before the budget 2026 Big increase in gas cylinder prices How much will you get now See the new rates | अर्थसंकल्पापूर्वी मोठा झटका! गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ; आता कितीला मिळणार? पाहा नवे दर

अर्थसंकल्पापूर्वी मोठा झटका! गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ; आता कितीला मिळणार? पाहा नवे दर

Gas Cylinder Price Hike: आज १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच ऑइल मार्केटिंग कंपन्या इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमनं ग्राहकांना महागाईचा झटका दिला आहे. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

प्रमुख शहरांतील व्यावसायिक सिलिंडरचे नवीन दर

इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाइटनुसार, १ फेब्रुवारीपासून १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचे दर खालीलप्रमाणे आहेत:

  • दिल्ली: १७४०.५० रुपये
  • मुंबई: १६९२ रुपये
  • कोलकाता: १८४४.५० रुपये
  • चेन्नई: १८९९.५० रुपये
     

पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या १ तारखेला किमतींचा आढावा घेतात. यापूर्वी जानेवारीतही दरवाढ झाली होती, तर गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये अनुक्रमे ५ आणि १० रुपयांची कपात करण्यात आली होती.

विमान इंधनाच्या दरात कपात

१ फेब्रुवारी २०२६ पासून विमान इंधनाच्या (एटीएफ) किमतीत कपात करण्यात आली आहे. दिल्लीत प्रति किलोलीटर एटीएफसाठी आता ९१,३९३.३९ रुपये मोजावे लागतील, जे पूर्वी ९२,३२३.०२ रुपये होते. डॉलरमध्ये ही किंमत ७९१.४८ वरून ७७८.८५ डॉलर प्रति किलोलीटर झाली आहे. कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्येही किमतीत घट झाली असून मुंबईत हा दर ८५,४७४.६३ रुपये प्रति किलोलीटर निश्चित करण्यात आला आहे.

बजेटच्या दिवशी गेल्या ५ वर्षांतील कल

इंडियन ऑइलच्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत अर्थसंकल्पाच्या दिवशी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मात्र, व्यावसायिक सिलिंडरच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाले आहेत:

  • २०२२: बजेटच्या दिवशी व्यावसायिक सिलिंडर ९१.५० रुपयांनी स्वस्त झाला होता.
  • २०२३: घरगुती किंवा व्यावसायिक अशा दोन्ही सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही.
  • २०२४: घरगुती सिलिंडरचे दर स्थिर राहिले, पण व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत १८ रुपयांची वाढ झाली होती.

Web Title : बजट से पहले गैस सिलेंडर की कीमतों में बढ़ोतरी; अब नए रेट देखें!

Web Summary : बजट से पहले कमर्शियल एलपीजी सिलेंडर की कीमतों में ₹50 की बढ़ोतरी हुई। घरेलू सिलेंडर की कीमतें अपरिवर्तित हैं। दिल्ली, कोलकाता, मुंबई और चेन्नई में विमान ईंधन (ATF) की कीमतों में कमी आई है।

Web Title : Gas Cylinder Price Hiked Before Budget; Check New Rates Now!

Web Summary : Commercial LPG cylinder prices increased by ₹50 before the budget. Domestic cylinder prices remain unchanged. Aviation turbine fuel (ATF) prices reduced in Delhi, Kolkata, Mumbai, and Chennai.