Join us  

मस्क यांच्या अडचणीत वाढ! "भरपाई न देता, बदला घेण्याची शपथ घेतली", माजी ट्विटर सीईओने दाखल केला खटला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 2:01 PM

ट्विटरचे या आधीचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह चार माजी अधिकाऱ्यांनी इलॉन मस्क यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. यामुळे मस्क यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

उद्योगपती इलॉन मस्क यांनी श्रीमंतीच्या यादीतील आपला पहिला नंबर गमावला आहे. तर दुसरीकडे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ट्विटरचे माजी सीईओ पराग अग्रवाल आणि काही माजी अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

इलॉन मस्क यांच्याविरोधात १२८ मिलियन डॉलरपेक्षा जास्त रकमेचा खटला दाखल केला आहे. पराग अग्रवाल यांच्यासह, ट्विटरचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल, माजी कायदेशीर मुख्य अधिकारी विजया गड्डे आणि माजी जनरल काउंसिल सीन एजेट यांनी गुन्हा दाखल केला आहे.

मस्क यांनी ट्विटरचे अधिग्रहण केल्यानंतर लगेचच हजारो कर्मचाऱ्यांना चांगल्या आणि योग्य कारणाशिवाय काढून टाकल्याचा आरोप दाखल करण्यात आला आहे, यामुळे कंपनी कर्मचाऱ्यांना योग्य मोबदला देत नव्हती. यासोबतच त्यांनी नियमांचा पालन केले नसल्याचे म्हटले आहे. 

होम लोन घेताना Fixed की Floating व्याजदर घेणं ठरू शकतं योग्य? अर्ज करण्यापूर्वी समजून घ्या

या प्रकरणी ट्विटरच्या एक्स्चेंज फाइलिंगचा हवाला देत पराग अग्रवाल यांना दरमहा १ मिलियन डॉलर पगार मिळणार होता, असे सांगण्यात आले आहे. यासोबतच त्याला कंपनीच्या ऑफर लेटरमध्ये १२.५ मिलियन डॉलर  किमतीचा कंपनी स्टॉक देण्याचे सांगितले होते. जर ट्विटरच्या माजी सीईओला अंतिम मुदतीपूर्वी पदावरून हटवले गेले तर ६० मिलियन डॉलर नुकसान भरपाई दिली जाईल. या प्रकरणात, नेड सेगल यांना ४६ दशलक्ष डॉलर्स आणि विजया पिटला यांना २१ दशलक्ष डॉलर्सची भरपाई देण्यास सांगितले आहे.

ऑक्टोबर २०२२ मध्ये, इलॉन मस्क यांनी ४४ अब्ज डॉलर देऊन ट्विटर विकत घेतले. यानंतर त्यांनी कंपनीचे विद्यमान सीईओ पराग अग्रवाल यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला. यासोबतच मस्क यांनी इतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले होते. एवढेच नाही तर कंपनीच्या ५० टक्के कर्मचाऱ्यांना काही महिन्यांतच नोकरीवरून काढून टाकण्यात आले.

इलॉन मस्क यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान गमावला आहे. त्यांना मागे टाकून ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, जेफ बेझोस यांची एकूण संपत्ती २०० अब्ज डॉलर आहे. इलॉन मस्क यांची एकूण संपत्ती १९८ अब्ज डॉलर्सवर आली आहे.

टॅग्स :एलन रीव्ह मस्कट्विटर