Join us

Yes Bankचे माजी सीईओ राणा कपूर यांच्या मुंबईतल्या घरावर ईडीची छापेमारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 03:18 IST

Yes Bankचे माजी सीईओ राणा कपूर यांच्या मुंबईतल्या घरावर छापेमारी

ठळक मुद्देYes Bankचे माजी सीईओ राणा कपूर यांच्या मुंबईतल्या वरळी स्थित(समुद्र महल) घरावर अंमलबजावणी संचालनालयाने छापा टाकला आहे.ईडीचे अधिकारी राणा कपूर यांच्याकडे बँकेद्वारे डीएचएफएलला देण्यात आलेल्या कर्जासंबंधी विचारपूस करत आहेत. निर्मला सीतारामण यांनी YES BANK प्रकरणात डीएचएफएलचं नाव घेतल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली आहे. 

नवी दिल्ली- Yes Bankचे माजी सीईओ राणा कपूर यांच्या मुंबईतल्या वरळी स्थित(समुद्र महल) घरावर अंमलबजावणी संचालनालयाने छापा टाकला आहे. तत्पूर्वी ईडीनं डीएचएफएलच्या कपिल धवन यांना मनी लाँड्रिंग प्रकरण आणि गॅगस्टर इक्बाल मिरचीशी संबंध असल्याच्या प्रकरणात अटक केली आहे. एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, YES BANKचे माजी सीईओ राणा कपूर यांच्या घरावर शुक्रवारी ईडीनं छापा टाकला असून, त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल केला आहे. ईडीचे अधिकारी राणा कपूर यांच्याकडे बँकेद्वारे डीएचएफएलला देण्यात आलेल्या कर्जासंबंधी विचारपूस करत आहेत. निर्मला सीतारामण यांनी YES BANK प्रकरणात डीएचएफएलचं नाव घेतल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली आहे. भांडवल कमतरतेमुळे कमकुवत स्थितीत असलेल्या येस बँक या खासगी बँकेची स्थिती आणखी खालावू नये यासाठी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेने या बँकेवर गुरुवारपासून निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार खातेदारांना त्यांच्या खात्यांतून ५० हजार रुपयांहून जास्त रक्कम काढू देण्यास मनाई करण्यात आली आहे.तसेच कर्मचाऱ्यांचे पगार, भाडे व कर आणि टपाल खर्चाखेरीज अन्य कोणत्याही कामासाठी ५० हजारांहून अधिक खर्च करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. दोन्ही बाबतीतील हे निर्बंध ३ एप्रिलपर्यंत लागू राहतील. तसेच बँकेचे संचालक मंडळही बरखास्त करण्यात आले असून स्टेट बँकेचे माजी सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत कुमार यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.येस बँकेचा चेहरा 30 दिवसांत बदलेल - अर्थमंत्री निर्मला सीतारामन

टॅग्स :अंमलबजावणी संचालनालय