Join us  

भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात मोठी वाढ, 636 अब्ज डॉलर्सवर पोहोचला फॉरेक्स रिझर्व्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 7:29 PM

Foreign Currency Reserves: लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतासाठी गुडन्यूज आली आहे.

India Forex Reserves: लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारसाठी गुडन्यूज आली आहे. भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात परकीय चलन साठा $10 अब्जाने वाढून $636.09 अब्ज झाला आहे. आता भारताचा परकीय चलनाचा साठा $645 अब्जच्या मागील ऐतिहासिक विक्रमी उच्चांकापासून फक्त $9 अब्ज दूर आहे.

15 मार्च 2024 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने परकीय चलनाच्या साठ्याची आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, 8 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलनाचा साठा 10.47 अब्ज डॉलरने वाढून 636.095 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. या कालावधीत परकीय चलन संपत्तीत 8.12 अब्ज डॉलरची वाढ झाली असून ती 562.35 अब्ज डॉलरवर आली आहे.

 

आरबीआयच्या आकडेवारीनुसार या काळात सोन्याच्या साठ्यातही वाढ झाली आहे. सोन्याचा साठा $2.29 अब्जने वाढून $50.71 बिलियन झाला आहे. SDR मध्ये 31 मिलियन डॉलर्सची वाढ झाली असून, 18.21 अब्ज डॉलर्स झाली आहे. IMF मधील साठादेखील $19 मिलियनने वाढून $4.81 बिलियन झाला आहे.

ऑक्टोबर 2021 मध्ये RBI च्या परकीय चलनाचा साठा $645 अब्जांवर पोहोचला होता. परंतु रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर वस्तूंच्या किमतीत तीव्र वाढ झाल्यामुळे यात घट झाली. डॉलरच्या तुलनेत रुपयाची कमजोरी थांबवण्यासाठी आरबीआयलाही हस्तक्षेप करावा लागला, त्यामुळेही परकीय चलनाच्या साठ्यात घट झाली. जेव्हा आरबीआय देशांतर्गत चलनाचे व्यवस्थापन करण्यासाठी किंवा डॉलरच्या तुलनेत त्याची घसरण थांबवण्यासाठी हस्तक्षेप करते, तेव्हा परकीय चलनाच्या साठ्यात बदल दिसून येतो.

टॅग्स :भारतगुंतवणूकपैसाव्यवसायलोकसभा