Join us

विदेशी चलन कर्जात जोखीम - रघुराम राजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 04:12 IST

भारताच्या ‘विदेशी चलन कर्ज’ जारी करण्याच्या योजनेचा खरोखर फायदा असा काही नाही तर त्यात जोखीम आहे, असे भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सांगितले.

नवी दिल्ली : भारताच्या ‘विदेशी चलन कर्ज’ जारी करण्याच्या योजनेचा खरोखर फायदा असा काही नाही तर त्यात जोखीम आहे, असे भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सांगितले.जागतिक बाँडस्ची विक्री करून भारत सरकारच्या बाँडस्ची किंमत कमी होणार नाही. स्थानिक बाजारपेठ आत्मसात करायला हवी आणि देशात अनुकूल वातावरण असताना खरेदी करणाऱ्या आणि अनुकूल नसलेल्या वातावरणात भाग विकणाºया अल्प-मुदतीच्या लहरी गुंतवणूकदारांपासून सावध राहिले पाहिजे, असे राजन यांनी म्हटले.अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या महिन्यात जाहीर केलेल्या योजनेवर विरोधी पक्षांनी केलेल्या टीकेत रघुराम राजन यांनीही आपला सूर मिसळला आहे.गती मंद असलेल्या अर्थव्यवस्थेत करापासूनचे उत्पन्न कमी झाल्यामुळे भारताला निधी उभारण्याचे पर्यायही कमी राहिले आहेत म्हणून परदेशात बाँडस्ची विक्री करण्याची योजना आहे. आर्थिक वर्ष २०१९-२०२० मध्ये १०३ अब्ज अमेरिकन डॉलर्सचे कर्ज घेण्याच्या भारताच्या योजनांबद्दलही गुंतवणूकदारांनी काळजी व्यक्त केली आहे.————————

टॅग्स :रघुराम राजन