Join us

जगात पहिल्यांदाच… ज्याला समजलं जातं कचरा, अदानींनी त्यानंच बनवला रस्ता; पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 11:06 IST

'वस्तू बनवा, वापरा आणि फेकून द्या' ही पद्धत निसर्गाचं अतिशोषण करते आणि पर्यावरणाची हानी करते. त्यामुळे आता सर्क्युलर इकॉनॉमी या संकल्पनेवर आर्थिक प्रगतीचा पाया निश्चित करण्यावर भर दिला जात आहे.

'वस्तू बनवा, वापरा आणि फेकून द्या' ही पद्धत निसर्गाचं अतिशोषण करते आणि पर्यावरणाची हानी करते. त्यामुळे आता सर्क्युलर इकॉनॉमी या संकल्पनेवर आर्थिक प्रगतीचा पाया निश्चित करण्यावर भर दिला जात आहे. या दिशेनं देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या एका कंपनीनं विश्वविक्रम केला आहे. अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडनं (APSEZ Ltd.) आपल्या हजीरा बंदरात स्टील स्लॅगपासून रस्ता तयार केला आहे. खासगी बंदरात स्टीलच्या स्लॅगनं रस्ता बांधण्याची ही जगात पहिलीच वेळ आहे.

१.१ किलोमीटरचा रस्ता

हजीरा बंदराच्या आत स्टीलस्लॅगपासून बनवलेल्या रस्त्याची लांबी १.१ किमी आहे. हा रस्ता मल्टी पर्पज बर्थला (एमपीबी-१) कोळसा यार्डशी जोडतो. सीएसआयआर-सीआरआरआय आणि विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सहकार्यानं हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. हा प्रकल्प बल्क अँड जनरल कार्गो टर्मिनलच्या (बीजीसीटी) दुसऱ्या टप्प्यातील विस्ताराचा भाग आहे.

F&O नं दिलाय जोरदार झटका, आर्थिक वर्षात गुंतवणूकदारांचे ₹१.०६ लाख कोटी बुडाले; SEBI नं काय म्हटलं?

वेस्ट टू वेल्थ मिशनला बळकटी 

CSIR-CRRI नं एक फुटपाथ डिझाइन केला आहे जो भार सहन करण्याची क्षमता आणि टिकाऊपणाच्या दृष्टीने योग्य आहे. या डिझाइनचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बांधकाम खर्च आणि पर्यावरणावर होणारा प्रतिकूल परिणाम दोन्ही कमी आहेत. यामुळे 'वेस्ट टू वेल्थ' या मोहिमेलाही बळकटी मिळते.

देशातील पहिला स्टील स्लॅग रोड २०२२ मध्ये बांधला

या रस्त्याचे औपचारिक उद्घाटन विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, नीती आयोगाचे सदस्य डॉ. विजय सारस्वत यांनी केलं. हजिरा बंदरापूर्वी, भारतातील आणखी दोन रस्ते स्टील स्लॅगपासून बनवण्यात आले आहेत. भारतातील पहिला स्टील स्लॅग रोड गुजरातमधील सुरत येथील हजिरा औद्योगिक क्षेत्रात बांधण्यात आला. २०२२ मध्ये बांधलेला तो १ किमी लांबीचा रस्ता सहा पदरी रस्ता आहे ज्यामध्ये सुमारे १ लाख टन प्रोसेस केलेलं स्टील स्लॅग वापरलं गेलंय. तो CSIR-CRRI, स्टील मंत्रालय, नीती आयोग आणि आर्सेलर मित्तल-निप्पॉन स्टील यांच्या सहकार्यानं बांधण्यात आला. त्यानंतर, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ (एनएच-६६) वर आणि नंतर अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवर स्टील स्लॅग रस्ते बांधण्यात आले आहेत.

टॅग्स :अदानीगौतम अदानी