दैनंदिन वापरातील वस्तू येत्या २२ सप्टेंबरपासून स्वस्त होणार आहेत. जीएसटी कपात झाल्याने नव्या दराने या वस्तू कंपन्या आणणार आहेत. परंतू, आधी आहेत त्यांचे काय करायचे? असा प्रश्न दुकानदारांपासून ते कंपन्यांना सतावत आहे. जीएसटी आधीच भरलेला आहे, मग तो रिकव्हर कसा करायचा? ही रक्कम रिकव्हर करण्यासाठी पुढचे काही महिने असेच थांबायचे की कसे, यापेक्षा आहे तो माल २०-३० टक्के डिस्काऊंट लावून देऊन टाकायचा या मुडमध्ये सध्या कंपन्या आल्या आहेत.
नवीन जीएसटी सुरु होण्यासाठी आता केवळ ५ दिवस राहिले आहेत. यामुळे विविध दुकानांत, शोरुम किंवा अन्य ठिकाणांवर जीएसटीची वाट कशाला पाहताय आम्ही २० टक्के डिस्काऊंट देतोय अशा विनवण्यात केल्या जात आहेत. वाहनांवरही जीएसटी कपातीएवढाच डिस्काऊंट दिला जात आहे. या खपाव्यात म्हणून आताच काय तो फेस्टिव्हल डिस्काऊंट, नंतर फक्त जीएसटीच कमी होणार म्हणूनही सांगितले जात आहे. अशातच एफएमसीजी कंपन्यांनी रिटेलर्सना कधी नव्हे तेवढी सूट देण्यास सुरुवात केली आहे.
२२ सप्टेंबरपूर्वी जुना माल वेगाने संपविण्याच्या मार्गावर या कंपन्या आहेत. या कंपन्या ४ ते २ टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट देत आहेत. हा डिस्काऊंट २१ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. जो माल उरेल तो त्यानंतर दोन एमआरपी किंमती छापून विकावा लागणार आहे. कारण आधीची एक एमआरपी असणार आहे. त्यावर आता दुसरी छापावी लागणार आहे. २२ सप्टेंबरनंतर ग्राहकांना फसविण्याचे धंदेही सुरु होण्याची शक्यता आहे. जास्त फायदा कमविण्यासाठी दुकानदार आधीच्याच एमआरपीने वस्तू विकण्याची शक्यता आहे. यामुळे ग्राहकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL), प्रॉक्टर अँड गॅम्बल (P&G) इंडिया, लोरियल इंडिया,हिमालय वेलनेस, डाबर इंडिया या सर्व कंपन्या हा डिस्काऊंट देत आहेत.