Join us
Daily Top 2Weekly Top 5

फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 09:54 IST

पूर्वी ५०-६० लाखांत फ्लॅट विकत घेण्याची योजना होती, मात्र लोक कोट्यवधींचा खर्च करू लागलेत. पण आता हा निर्णय त्यांच्यासाठी तोट्याचा विषय ठरत आहे.

कोरोना महासाथीनंतर मोठ्या फ्लॅटची मागणी वाढली. याचं मुख्य कारण म्हणजे वर्क फ्रॉम होम कल्चर. लोकांनी आपल्या घराला ऑफिस बनवलं, ज्यामुळे त्यांना अधिक जागेची गरज भासू लागली. त्यामुळे मोठ्या फ्लॅटची मागणी वाढली आणि अनेक घर खरेदीदारांनी बजेटपेक्षा जास्त खर्च केला. पूर्वी ५०-६० लाखांत फ्लॅट विकत घेण्याची योजना होती, मात्र लोक कोट्यवधींचा खर्च करू लागलेत. पण आता हा निर्णय त्यांच्यासाठी तोट्याचा विषय ठरत आहे.

SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?

बिल्डरांनी फ्लॅटचा आकार नक्कीच वाढवला, पण लोडिंगच्या नावाखाली तितका एरिया मिळत नाहीये. लोडिंग अर्थात कॉमन एरिया इतका वाढला की प्रत्यक्ष वापरलेला भाग म्हणजे कार्पेट एरिया लहान झाला. त्यामुळे एकीकडे घर खरेदीदारांना फ्लॅटसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत, तर दुसरीकडे त्यांना कमी जागा मिळत आहे. त्यामुळे त्यांचं दुहेरी नुकसान होत आहे.

किती वाढलं लोडिंग?
मुंबई मेट्रोपॉलिटन क्षेत्र३३ टक्के४३ टक्के
पुणे३२ टक्के४० टक्के
दिल्ली एनसीआर३१ टक्के४१ टक्के
कोलकाता३० टक्के ३९ टक्के
हैदराबाद३० टक्के३८ टक्के
चेन्नई ३० टक्के३६ टक्के

अ‍ॅनारॉकचा अहवाल काय म्हणतो?

अ‍ॅनारॉकच्या अहवालानुसार, अपार्टमेंटमधील सुपर-बिल्ट-अप एरिया आणि कार्पेट एरिया मधील अंतर गेल्या काही वर्षांत वाढलं आहे, देशातील प्रमुख शहरांमधील बांधकाम व्यावसायिकांनी सामान्य सुविधा प्रदान करण्यासाठी गेल्या काही वर्षांत सरासरी लोडिंग टक्केवारी ४०% पर्यंत वाढवली आहे. २०१९ मध्ये सरासरी लोडिंग टक्केवारी ३१ टक्के होती. तर, यावर्षी जानेवारी-मार्च तिमाहीत ते ४० टक्क्यांपर्यंत वाढलेय. याचा अर्थ फ्लॅट मालकांना राहण्यायोग्य जागा कमी मिळत आहे. उदाहरणार्थ, जर सुपर बिल्ट-अप क्षेत्र १,३०० चौरस फूट आणि कार्पेट क्षेत्र १,००० चौरस फूट असेल तर लोडिंग टक्केवारी ३० टक्के असेल.

विकासकांनी लोडिंग का वाढवलं?

रिअल इस्टेट तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोना महासाथीनंतर लक्झरी प्रॉपर्टीची मागणी झपाट्यानं वाढली आहे. मेट्रो शहरांमध्ये उत्तम जीवनशैली आणि सर्व सोयीसुविधांच्या प्रकल्पांची मागणी वाढली. फिटनेस सेंटर, क्लबहाऊस, पार्क सारखं गार्डन आणि भव्य लॉबीची अपेक्षा घर खरेदीदारांना आता मूलभूत जीवनशैलीच्या सोयी-सुविधांबाबत समाधान वाटत नाही. त्यामुळे आराखड्यात बदल करून सर्व सोयी-सुविधा देण्याचा विकासकांचा प्रयत्न आहे. प्रकल्प सुंदर दिसणं देखील महत्वाचं आहे. याचा फटका सुपर एरिया वाढला असून फ्लॅटचा कार्पेट एरिया कमी झाला. मोठ्या आकाराच्या फ्लॅटसाठी जास्त पैसे देऊनही घर खरेदीदारांना छोटं घर मिळत आहे.

टॅग्स :व्यवसायमुंबईपुणेदिल्ली