Join us  

Fuel Price: दिल्लीसह या 6 राज्यांतील पेट्रोल-डिझेलवर लागणार एकसमान टॅक्स, जाणून घ्या होणारे फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 8:55 AM

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलचे आणि डिझेलचे भाव वाढतच चालले आहेत.

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलचे आणि डिझेलचे भाव वाढतच चालले आहेत. त्यामुळे सामान्यांचंही बजेट कोलमडलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा वाढता दर आणि इराणवरील निर्बंधांमुळे खनिज तेलाचे भाव वाढत असल्याचं कारण केंद्रानं दिलं आहे. त्यातच दिल्लीसह या 6 राज्यांमध्ये वाहन धारकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरावर उपाय म्हणून पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि केंद्र शासित चंदीगडमध्ये पेट्रोलियम उत्पादकांनी एकसमान टॅक्स लावण्यास सहमती दर्शवली आहे. मंगळवारी जारी केलेल्या एका विधानानुसार, या राज्यांतील दारू, गाड्यांची नोंदणी, परिवहन परमिटच्या प्रकरणातही एकसमान टॅक्स लावण्याला परवानगी दिली आहे. पाच राज्यांतील अर्थमंत्री आणि केंद्र शासित प्रदेश असलेल्या चंदीगडमधल्या अधिका-यांनी या प्रकरणात एक बैठक घेऊन चर्चा केली आहे.बैठकीदरम्यान पेट्रोल-डिझेलवर व्हॅटचे दर समान ठेवण्यास सहमती झाली आहे, अशी माहिती बैठकीनंतर एका अधिका-यानं दिली आहे. यानंतर यासंबंधी एक उपसमिती तयार करण्यात येणार असून, येत्या 15 दिवसांत या सहा राज्यांत एकसमान टॅक्स ठेवण्याला सहमती मिळाली आहे. तसेच समान दरांच्या व्यापारातील अफरा-तफरीलाही ब्रेक लागणार आहे.हरियाणाचे अर्थममंत्री कॅप्टन अभिमन्यू म्हणाले, बैठकीत ठरल्याप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटचे दरांमध्ये समानता आणण्याची गरज आहे. जेणेकरून वाहनचालकांना काहीसा दिलासा देता येईल. पंजाबमध्ये सर्वाधिक व्हॅट लागतो. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया बैठकीनंतर म्हणाले, या निर्णयामुळे सरकारचा महसूल वाढेल आणि त्याचबरोबर काळाबाजाराला आळा बसेल. 

टॅग्स :इंधन दरवाढपेट्रोलडिझेल