Join us
Daily Top 2Weekly Top 5

Fino Payments Bank चे सीईओ ऋषी गुप्ता यांना अटक; का करण्यात आली मोठी कारवाई? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 09:50 IST

Fino Payments Bank: फिनो पेमेंट्स बँकेचे (Fino Payments Bank) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषी गुप्ता यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पाहा का करण्यात आली ही कारवाई.

Fino Payments Bank: फिनो पेमेंट्स बँकेचे (Fino Payments Bank) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषी गुप्ता यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जीएसटी (GST) नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. बँकेनं शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) शेअर बाजाराला यासंदर्भात माहिती दिली.

बँकेनं दिलेल्या माहितीनुसार, एमडी आणि सीईओ ऋषी गुप्ता यांना 'सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स' (CGST) आणि 'स्टेट गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स' (SGST) कायद्याच्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली आहे. एक्सचेंज फायलिंगनुसार, ही कारवाई दिवसाच्या सुरुवातीला करण्यात आली. मात्र, ही तपासणी काही बिझनेस पार्टनर्सशी संबंधित असल्याचं बँकेनं स्पष्ट केलंय.

SBI नं नवी मुंबईत भाड्यानं घेतलं ऑफिस; महिन्याचं रेंट १.६८ कोटी, पाहा डिटेल्स

बँकेने CFO कडे सोपवली कमान

ऋषी गुप्ता यांच्या अटकेनंतर बँकेने तातडीनं पर्यायी व्यवस्था केली आहे. बँकेचे चीफ फायनान्शिअल ऑफसर (CFO) केतन मर्चंट यांची आता संस्थेचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते बँकेच्या दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळतील.

स्मॉल फायनान्स बँकेसाठी मिळाली मंजुरी

नुकतेच फिनो पेमेंट्स बँकेला स्मॉल फायनान्स बँक (Small Finance Bank) म्हणून कार्य करण्यासाठी तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे. या बँकेने ऑक्टोबर-डिसेंबर २०२३ मध्ये परवान्यासाठी अर्ज केला होता. स्मॉल फायनान्स बँकेत रूपांतरित होण्याची परवानगी मिळवणारी ही पहिली पेमेंट्स बँक आहे. बँकेचे कामकाज २०१७ मध्ये सुरू झालं होतं. पेमेंट्स बँक आणि स्मॉल फायनान्स बँक यांच्यातील मुख्य फरक असा आहे की, पेमेंट्स बँका कर्ज देऊ शकत नाहीत आणि त्या प्रति ग्राहक केवळ २ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी स्वीकारू शकतात.

देशातील १२ वी स्मॉल फायनान्स बँक

मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फिनो पेमेंट्स बँक देशातील १२ वी स्मॉल फायनान्स बँक बनेल. सध्या या श्रेणीमध्ये एयू SFB, इक्विटास SFB, सूर्योदय SFB, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, जना स्मॉल फायनान्स बँक, युनिटी स्मॉल फायनान्स बँक, कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक, ईसाफ स्मॉल फायनान्स बँक, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक, शिवालिक स्मॉल फायनान्स बँक आणि स्लाइस स्मॉल फायनान्स बँक यांचा समावेश आहे.

शेअरमध्ये ११.१५ टक्क्यांची घसरण

फिनो पेमेंट्स बँक लिमिटेडचा शेअर शुक्रवारी बीएसईवर ६.७५ टक्क्यांच्या घसरणीसह १९४ रुपयांवर बंद झाला. गेल्या आठवड्यात शेअरमध्ये ८.३२ टक्क्यांची आणि एका महिन्यात ७.०४ टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या ३ महिन्यांत कंपनीचे शेअर्स ३५.१३ टक्क्यांनी घसरले आहेत. या वर्षात आतापर्यंत २५.९३ टक्के घसरण पाहायला मिळाली आहे. गेल्या एका वर्षात हा शेअर १३.१२ टक्क्यांनी पडला असून ३ वर्षांत या शेअरनं ११.१५ टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Fino Payments Bank CEO Rishi Gupta Arrested: Reasons Revealed

Web Summary : Fino Payments Bank CEO Rishi Gupta was arrested for GST violations. CFO Ketan Merchant is now in charge. The bank recently received approval to become a Small Finance Bank. Shares fell sharply following the news.
टॅग्स :बँकजीएसटी