Meta Layoff vs Bonus : मेटा कंपनीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आपल्या पॉलिसींमुळे कायम चर्चेत असते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते अशी या माध्यमाची ओळख आहे. इथे समता, बंधुता आणि स्वातंत्र्यता पाळली जाते, असे सांगितले जाते. मात्र, फेसबुकचे दाखवण्याचे दात आणि खाण्याचे दात वेगळं असल्याचं नुकत्याच घडलेल्या एका घटनेवरुन समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने कॉस्ट कटींगच्या नावाखाली अनेक कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. याउलट वरीष्ठ पदावरील बॉस लोकांना कंपनीने तब्बल २०० टक्के बोनस दिल्याचे समोर आलं आहे. कंपनीने स्वतःच याबद्दल घोषणा केली आहे.
मेटाने गुरुवारी आपल्या कॉर्पोरेट फाइलिंगमध्येही याची घोषणा केली आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, मेटाचे नामांकित कार्यकारी अधिकारी आता त्यांच्या मूळ वेतनाच्या २००% बोनस मिळवू शकतात. यापूर्वी ही रक्कम ७५% होती. मात्र, बोनसमधील हे बदल मेटा सीईओ झुकेरबर्ग यांना लागू होणार नाहीत, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. याचा अर्थ त्यांना २०० टक्के बोनसचा लाभ मिळणार नाही.
फेसबुकमध्ये होणार मोठी कर्मचारी कपातएकीकडे कंपनीने बॉस लोकांचा पगार वाढवला आहे. तर दुसरीकडे कंपनी लवकरच ५ टक्के कामगार कपात करणार आहे. या प्रक्रियेनंतर अवघ्या आठवडाभरात मेटाने बोनस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, कंपनीने आपल्या हजारो कर्मचाऱ्यांसाठी वार्षिक स्टॉक ऑप्शन वितरण १० टक्क्यांनी कमी केले आहे. या कपातीचा प्रभाव त्यांच्या भूमिका आणि स्थानानुसार बदलू शकतो.
नफा वाढत असताना कर्मचारी कपातकंपनीचा खर्च कमी करण्यासाठी मेटाने हजारो कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्षात कंपनीचा नफा कमी होण्याऐवजी वाढत आहे. गेल्या वर्षी, मेटा शेअर्स ४७ टक्क्यांनी वाढले आणि गुरुवारी ६९४.८४ डॉलर्स वर बंद झाले. जानेवारीमध्ये, मेटाने चौथ्या तिमाहीत ४८.३९ बिलियन डॉलर्सची केली होती. जी दरवर्षी २१% ची वाढ दर्शवते. असे असतानाही कंपनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत आहे.