लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सतत भाववाढ सुरू असलेल्या सोने-चांदीच्या भावात गुरुवारीदेखील (२९ जानेवारी) मोठी वाढ नोंदली गेली. चांदीच्या भावात एकाच दिवसात तब्बल ३७ हजार रुपयांनी वाढ होऊन ती ४ लाख १० हजार रुपयांवर पोहोचली. तर सोन्याच्या भावात १६ हजार रुपयांची वाढ होऊन ते १ लाख ८२ हजार रुपयांवर पोहोचले आहे.
बुधवारी (२८ जानेवारी) १३ हजार रुपयांची वाढ होऊन चांदी ३ लाख ७३ हजार रुपयांवर पोहचली होती. या दिवशी पावणे चार लाख रुपयांच्या उंबरठ्यावर असलेल्या चांदीच्या भावात दुसऱ्या दिवशी, २९ जानेवारी सुरुवातीला २२ हजार रुपयांची वाढ झाली. त्यामुळे संध्याकाळपर्यंत ती ३ लाख ९५ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली. त्यानंतर ही वाढ कायम राहत रात्री पुन्हा १५ हजार रुपयांची वाढ होऊन चांदी ४ लाख १० हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. जीएसटीसह चांदीचा भाव ४ लाख २२ हजार ३०० रुपये प्रति किलो झाला आहे.२९ जानेवारी रोजी झालेली ३७ हजार रुपयांची वाढ आतापर्यंतची चांदीमधील सर्वात मोठी वाढ आहे. यापूर्वी २० जानेवारी रोजी एकाच दिवसात चांदीमध्ये १७ हजार रुपयांची वाढ झाली होती.
दुसरीकडे २८ जानेवारी रोजी ६ हजार ३०० रुपयांच्या भाववाढीने १ लाख ६६ हजार रुपयांवर पोहोचलेल्या सोन्याच्याही भावात २९ जानेवारी रोजी संध्याकाळपर्यंत ११ हजार ५०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोने १ लाख ७७ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. रात्री पुन्हा ४ हजार ५०० रुपये अर्थात दिवसभरात एकूण १६ हजार रुपयांनी वाढ होऊन सोने १ लाख ८२ हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. जीएसटीसह सोने १ लाख ८७ हजार ४६० रुपये प्रति तोळा झाले आहे.
Web Summary : Gold and silver prices surged on January 29th. Silver soared by ₹37,000 to ₹4,10,000 per kg, while gold rose by ₹16,000 to ₹1,82,000 per tola, marking unprecedented single-day increases.
Web Summary : 29 जनवरी को सोना और चांदी की कीमतों में उछाल आया। चांदी ₹37,000 बढ़कर ₹4,10,000 प्रति किलो हो गई, जबकि सोना ₹16,000 बढ़कर ₹1,82,000 प्रति तोला हो गया, जो एक ही दिन में अभूतपूर्व वृद्धि दर्शाता है।