नवी दिल्ली : निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमिताभ कांत यांना बुधवारी दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयाने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली.कांत यांचा कार्यकाळ ३0 जून- पासून पुढे आणखी दोन वर्षांसाठी वाढविला आहे. ते ३0 जून २0२१ पर्यंत या पदी राहतील. कांत यांची १७ फेब्रुवारी २0१७ रोजी दोन वर्षांसाठी नेमणूक झाली होती.
अमिताभ कांत यांना मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 03:58 IST