Join us
Daily Top 2Weekly Top 5

महागाई भत्ता ५०% झाला तरी नवा वेतन आयोग नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 05:31 IST

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी २०२४ पर्यंत ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त हाेण्याचा अंदाज आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी २०२४ पर्यंत ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त हाेण्याचा अंदाज आहे. अशा स्थितीत सरकारची आठवा वेतन आयाेग स्थापन करण्याची याेजना आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला. त्यावर सरकारने स्पष्टपणे नकार दिला आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चाैधरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

महागाई भत्ता ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त झाल्यास वेतनाची फेररचना करण्याची शिफारस सातव्या वेतन आयाेगाने केली हाेती. या आयाेगाच्या आधारे वेतन व भत्त्यांची फेररचना करण्यास मंजुरी दिली हाेती. त्यानंतर याबाबत विचार केलेला नसून आठव्या वेतन आयाेगाचा प्रस्ताव विचाराधीन नाही,  असे उत्तर चाैधरी यांनी दिले. 

टॅग्स :कर्मचारी