Join us

ईव्हीचा 'सायलेंट धोका' संपणार! इलेक्ट्रिक वाहनांसाठी AVAS ध्वनी प्रणाली अनिवार्य होणार? काय आहे प्रकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 10:52 IST

Electric Vehicle : रस्त्याने चालताना इलेक्ट्रिक वाहने आवाज करत नाही. पण, यामुळे अपघातांची शक्यता वाढत आहे. हाच धोका कमी करण्यासाठी सरकार आता मोठं पाऊल उचलणार आहे.

Electric Vehicle : आजकाल रस्त्याने चालताना इलेक्ट्रिक वाहनांची अनेकांना भिती वाटते. कारण, त्यांचा कुठलाही आवाज येत नाही. अशात अपघात होण्याची शक्यता वाढते. देशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पादचारी आणि इतर रस्ते वापरकर्त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, मंत्रालयाने ध्वनिक वाहन अलर्टिंग सिस्टीम अनिवार्य करण्याची मसुदा अधिसूचना जारी केली आहे. रस्ते सुरक्षेला जागतिक पातळीवर नेण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.

काय आहे 'AVAS' आणि त्याची गरज का?पारंपारिक इंधन वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहने चालताना अत्यंत शांत असतात किंवा शून्य आवाज करतात. ही शांतता त्यांना रस्त्यावर एक प्रकारचा "अदृश्य धोका" बनवते.Acoustic Vehicle Alerting System (AVAS) हे एक उपकरण आहे, जे इलेक्ट्रिक किंवा हायब्रिड वाहने कमी वेगाने चालत असताना कृत्रिम आवाज निर्माण करते.या कृत्रिम आवाजाचा मुख्य उद्देश पादचारी, विशेषतः नेत्रहीन आणि वृद्ध लोकांना, रस्त्यावर वाहनाच्या उपस्थितीबद्दल वेळेवर सावध करणे आणि अपघात टाळणे आहे.

दोन टप्प्यांत अंमलबजावणी होणारमंत्रालयाने जारी केलेल्या मसुदा अधिसूचनेनुसार, हा नियम देशभरात दोन टप्प्यांत लागू केला जाईलपहिला टप्पा (१ ऑक्टोबर २०२६): या तारखेपासून बाजारात लॉन्च होणाऱ्या सर्व नवीन इलेक्ट्रिक वाहनांच्या मॉडेल्समध्ये AVAS प्रणाली बसवणे अनिवार्य असेल.दुसरा टप्पा (१ ऑक्टोबर २०२७): या तारखेपासून हा नियम सध्याच्या मॉडेल्सवरही लागू केला जाईल.

मानक आणि श्रेणी : श्रेणी M (प्रवासी वाहतूक, उदा. कार आणि बसेस) आणि श्रेणी N (मालवाहतूक, उदा. इलेक्ट्रिक ट्रक) मधील इलेक्ट्रिक वाहनांना AVAS बसवणे आवश्यक असेल. ही प्रणाली AIS-173 मानकांशी सुसंगत असणे अनिवार्य आहे.

वाचा - पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?

भारत जागतिक सुरक्षा मानकांकडेया निर्णयामुळे भारत आता इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षा मानकांमध्ये अमेरिका, जपान आणि युरोपीय संघ यांसारख्या विकसित राष्ट्रांच्या पंक्तीत सामील होत आहे. या अनेक देशांमध्ये AVAS सिस्टीम यापूर्वीच कायदेशीररित्या अनिवार्य करण्यात आली आहे. रस्ते अपघात कमी करण्याच्या दृष्टीने, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा हा प्रस्ताव अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Electric vehicles' silent threat to end: AVAS sound system mandatory?

Web Summary : Electric vehicles will soon be equipped with mandatory Acoustic Vehicle Alerting Systems (AVAS) to enhance pedestrian safety. The system emits artificial sounds at low speeds. Implementation will be phased, starting with new models in 2026 and existing models in 2027, aligning India with global safety standards.
टॅग्स :इलेक्ट्रिक कार / स्कूटरकारवाहतूक कोंडीस्कूटर, मोपेड