Join us  

ESIC चा मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांसाठी चांगल्या सुविधा  मिळणार, स्वत: नवीन रुग्णालये चालविणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 3:11 PM

esic to run new hospitals all by itself takes steps to improve supply of services : ईएसआयसी आरोग्य विमा योजनेच्या लाभार्थ्यांना घराजवळील कोणत्याही खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची सुविधा मिळाली आहे.

ठळक मुद्देईएसआयसी मुख्यालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) www.esic.nic.in  या वेबसाइट  उपलब्ध आहेत.

नवी दिल्ली : कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ESIC) आपल्या लाभार्थ्यांच्या सेवांच्या पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. ईएसआयसी आरोग्य विमा योजनेच्या लाभार्थ्यांना घराजवळील कोणत्याही खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची सुविधा मिळाली आहे. आरोग्य विमा योजनेतील लाभार्थीच्या घराच्या दहा किमीच्या परिसरात जर ईएसआयसी रुग्णालय नसेल तर कर्मचारी राज्य राज्य विमा महामंडळाच्या पॅनेलमध्ये समावेश असलेल्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी जाऊ शकतात. (esic to run new hospitals all by itself takes steps to improve supply of services)

कामगार मंत्रालयाने असे म्हटले आहे की, जर राज्य सरकारने स्वतःच रुग्णालय चालविण्याचा आग्रह धरला नाही तर सर्व नवीन रुग्णालये आणि भविष्यातील रुग्णालये ईएसआयसीद्वारेच चालविली जातील. कर्मचार्‍यांच्या मागणीनुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे. लाभार्थ्यांना अधिक चांगल्या वैद्यकीय सेवा पुरविणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे.

बैठकीत निर्णयकामगार व रोजगार राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या 183 व्या बैठकीत कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ईएसआयसी) कर्मचार्‍यांना वैद्यकीय सेवांचा पुरवठा आणि इतर फायदे सुधारण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.

कर्मचाऱ्यांना मोठा दिलासाईएसआयसीने आपल्या सर्व सदस्यांना किंवा लाभार्थ्यांना इमरजन्सीमध्ये जवळ असलेल्या कोणत्याही खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली आहे. सध्याच्या प्रणालीनुसार, विमाधारक व्यक्ती आणि लाभार्थी जे ईएसआयसी योजनेच्या कक्षेत आहेत त्यांना ईएसआयसी रुग्णालयात जाणे आवश्यक आहे आणि तेथून बाहेरील किंवा बाहेरील रूग्णालयात उपचार घ्यावे लागेल.

24 तासांच्या आत ऑनलाइन परवानगी घ्यावी लागणार जर एखाद्या लाभार्थ्याला रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असल्यास नियुक्त रूग्णालयाने 24 तासांच्या आत लाभार्थ्यास कॅशलेस आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी ईएसआयच्या अधिकृत अधिकाऱ्यामार्फत ऑनलाईन परवानगी घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात ईएसआयसी मुख्यालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) www.esic.nic.in  या वेबसाइट  उपलब्ध आहेत. 

टॅग्स :कर्मचारीनोकरीव्यवसायआरोग्य