Join us

EPFO चे सुखावणारे आकडे; 2024 मध्ये PF भागधारकांची संख्या 7.37 कोटींवर पोहोचली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 18:53 IST

हे आकडे दर्शवतात की भारतात विविध क्षेत्रातील नोकऱ्या आणि व्यवसायांची संख्या वाढत आहे.

EPFO News : देशातील नोकरदार वर्गासाठी PF ही सुरक्षित गुंतवणूक आहे. यात गुंतवणूक केल्यामुळे वृद्धापकाळात येणाऱ्या आर्थिक अडचणींचा सामना करता येतो. सरकारी असो वा खासगी कर्मचारी, दर महिन्याला तुमच्या पगारातील काही भाग कापून तुमच्या पीएफ खात्यात ट्रान्सफर केला जातो. कंपनी तुमच्या पीएफमध्ये तेवढीच रक्कम योगदान देते, ज्यावर सरकार व्याज देखील देते. 

कर्मचाऱ्यांच्या पीएफचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे (ईपीएफओ) ऑडिट केले जाते. ताज्या अहवालानुसार, 2023-24 या आर्थिक वर्षात EPFO ​​मध्ये योगदान देणाऱ्या सदस्यांची संख्या 7.6 टक्क्यांनी वाढून 7.37 कोटी झाली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात EPFO ​​ग्राहकांची संख्या 6.85 कोटी होती. आता यात योगदान देणाऱ्या संस्थांची संख्या 6.6 टक्क्यांनी वाढून 7.66 लाख झाली आहे.

या आकडेवारीचा अर्थ काय?कामगार मंत्रालयाने जारी केलेल्या या आकडेवारीनुसार 2023-24 या आर्थिक वर्षात EPFO ​​मध्ये योगदान देणाऱ्या लोकांच्या संख्येत 7.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हे आकडे दर्शवतात की भारतात विविध क्षेत्रातील नोकऱ्या आणि व्यवसायांची संख्या वाढत आहे. 

ईपीएफओ सेटलमेंटचा दावा ईपीएफओच्या थकबाकीच्या वसुलीतही 55.4 टक्क्यांनी वाढ झाली असून, गेल्या वर्षी 3390 कोटी रुपयांच्या तुलनेत 5268 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाली काढलेल्या दाव्यांची संख्या 4.12 कोटींवरून 4.45 कोटींवर 7.8 टक्क्यांनी वाढली आहे.

अनुकंपा नियुक्ती धोरण, 2024 च्या मसुद्यावरही चर्चाकार्यकारी समितीने नवीन अनुकंपा नियुक्ती धोरण, 2024 च्या मसुद्यावरही चर्चा केली, ज्याचा उद्देश सेवेदरम्यान दुर्दैवाने मृत्यू झालेल्या अनेक EPFO ​​कर्मचाऱ्यांच्या आश्रितांना आणि मुलांना दिलासा देणे आहे. याशिवाय बैठकीत कार्यकारी समितीने EPFO ​​मधील चांगल्या प्रशासनासाठी IT, प्रशासकीय, आर्थिक आणि इतर संबंधित पैलूंवर चर्चा केली. सरकार EPS पेन्शन पेमेंटसाठी नवीन केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टम सुरू करण्यावर काम करत आहे.

टॅग्स :भविष्य निर्वाह निधीगुंतवणूक