Join us  

तुमच्या PFच्या पैशावर येऊ शकते मोठे संकट; EPFOकडून 6 कोटी खातेधारकांसाठी महत्त्वाची सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2021 10:16 AM

epfo alert : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या 6 कोटी पीएफ खातेधारकांना वैयक्तिक माहिती आणि कोणत्याही प्रकारचे अॅप डाउनलोड करण्याबाबत सतर्क केले आहे.

नवी दिल्ली : जर तुम्ही पीएफ खातेधारक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. दरम्यान, कर्मचारीभविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या सर्व ग्राहकांना अलर्ट जारी केला आहे. कर्मचारीभविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या 6 कोटी पीएफ खातेधारकांना वैयक्तिक माहिती आणि कोणत्याही प्रकारचे अॅप डाउनलोड करण्याबाबत सतर्क केले आहे. ईपीएफओने आपल्या ट्विटर हँडलवर ही माहिती दिली आहे.

कोणत्याही नोकरदार व्यक्तीसाठी, त्याच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम अर्थात पीएफ सर्वात महत्वाची आहे. ही रक्कम भविष्यातील सुरक्षिततेसाठी सर्वात महत्वाचा निधी आहे. यामध्ये पैसे जमा केले जातात, तसेच त्या पीएफवर व्याज देखील मिळते. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या पीएफ पैशांबाबत खूप सतर्क असणे आवश्यक आहे.

काय म्हटले आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने?कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या खातेधारकांना कोणत्याही बनावट कॉल्सपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. ईपीएफओने अलर्टमध्ये म्हटले आहे की, "ईपीएफओ कधीही फोन कॉलवर आपल्या खातेधारकांकडून यूएएन नंबर, आधार क्रमांक, पॅन नंबर किंवा बँकेची माहिती मागत नाही. ईपीएफओ त्याच्या खातेधारकांना कोणताही फोन कॉल करत नाही."

(करोडो पीएफ खातेधारकांना दिवाळीपूर्वी मिळू शकतं 'हे' गिफ्ट!)

टॅग्स :भविष्य निर्वाह निधीकर्मचारी