Join us  

EPFOने नोकरदारांना दिला मोठा अलर्ट; 'या' ऑफर्सपासून राहा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 9:00 AM

खोट्या ऑफर्सवरून क्लेम सेटलमेंट, ऍडवान्स, अधिक पेन्शन आणि इतर कोणत्याही सुविधेसाठी आपल्याला बँकेत पैसे जमा करण्यास सांगितल्यास त्यापासून सतर्क राहा.

नवी दिल्लीः कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं नोकरदारांना अलर्ट दिला आहे. ईपीएफओ (EPFO)ने नोकरदारांना वेबसाइट (Website), टेली कॉल्स (Tele Calls), एसएमएस (SMS), ईमेल (E-mail), सोशल मीडिया (Social Media)च्या फेक ऑफर्सपासून सावध केलं आहे. EPFOने आपल्या युजर्सला अलर्ट दिला असून, जर कोणी आपल्याला बँकेत पैसे जमा करण्यास सांगितल्यास सतर्कता बाळगा. खोट्या ऑफर्सवरून क्लेम सेटलमेंट, ऍडवान्स, अधिक पेन्शन आणि इतर कोणत्याही सुविधेसाठी आपल्याला बँकेत पैसे जमा करण्यास सांगितल्यास त्यापासून सतर्क राहा.   EPFO ने आपल्या ट्विटमध्ये फेक न्यूजसंदर्भात माहिती दिली आहे. 

  • ही माहिती करू नका सार्वजनिकः EPFOने आपल्या सब्क्रायबर्सला अपील केलं आहे की, आधार नंबर, पॅन, बँक डिटेल्स संबंधी खासगी माहिती सार्वजनिक करू नका. EPFO ने PFसब्सक्राइबर्सला युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN) देण्यासही मज्जाव केला आहे. EPFOने यासंबंधीची माहिती स्वतःची वेबसाइट आणि ट्विटरवर दिली आहे. आम्ही तुमच्याशी कधीही फोनवर पॅन, आधार नंबर किंवा बँकेशी संबंधित कोणतीही माहिती मागत नाही. आपण फेक कॉल आल्यास व्यक्तिगत माहिती देऊ नका. 
  • इथे नोंदवा तक्रारः जर आपल्याला फसवणूक झाल्यानंतर तक्रार करायची असल्यास तुम्ही कामगार मंत्रालया (Ministry of Labour and Employment)च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाऊ शकता. इथे तुम्ही तक्रार नोंदवू शकता. आपल्या तक्रारीची दखल घेऊन कामगार मंत्रालय EPFOला आवश्यक कारवाई करण्याचे आदेश देऊ शकते. तुम्ही थेटसुद्धा EPFOशी संपर्क साधू शकता. EPFOचा 1800118005 हा टोल फ्री नंबर आहे, जो आठवड्याच्या प्रत्येक दिवशी 24 तास खुला असतो.  
  • काही सेकंदांत मिळवा पीएफ बॅलन्सः EPFOनं सब्सक्रायबर्सला आपल्या पीएफ बॅलन्स माहिती करून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे काही सेकंदांत आपण पीएफ बॅलन्स चेक करू शकता. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही आपण संपर्क साधू शकता. EPFOनं 6 कोटी सब्सक्रायबर्सला ही सुविधा दिली आहे. यात 12 लाख मालक कंपनी आणि 65 लाख निवृत्तीवेतनधारक आहेत. तुम्ही EPFOचे सब्सक्रायबर्स असल्यास तुम्ही सोशल मीडियातल्या ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून संपर्क साधू शकता. 
टॅग्स :पैसाभविष्य निर्वाह निधी