Join us  

नोकरभरतीत २१ टक्क्यांची वाढ; आयटीने पुन्हा घेतली झेप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 7:14 AM

नवी दिल्ली : आॅक्टोबरमध्ये भारतातील नोकरभरती आधीच्या वर्षाच्या तुलनेत तब्बल २१ टक्क्यांनी वाढली आहे. आॅक्टोबरचा नोकऱ्यांसंदर्भातील जॉबस्पीक निर्देशांक २,0८८ ...

नवी दिल्ली : आॅक्टोबरमध्ये भारतातील नोकरभरती आधीच्या वर्षाच्या तुलनेत तब्बल २१ टक्क्यांनी वाढली आहे. आॅक्टोबरचा नोकऱ्यांसंदर्भातील जॉबस्पीक निर्देशांक २,0८८ अंकांवर पोहोचला. मागील वर्षी याच काळात तो १,७२८ अंकांवर होता. नोकरी डॉट कॉमने केलेल्या सर्वेक्षणानुसार, यंदाच्या आॅक्टोबरमध्ये आयटी क्षेत्रात सर्वाधिक नोकरभरती पाहायला मिळाली. अमेरिकेने व्हिसावर लादलेल्या बंधनामुळे आयटी क्षेत्रात पिछेहाट झालेली होती. परंतु, मागील दोन महिन्यांपासून या क्षेत्राने पुन्हा एकदा झेप घेतली असून, त्याचा फायदा नोकरभरतीला झाला आहे. आगामी काही महिन्यांत ही गती कायम राहण्याची शक्यता आहे.

सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे की, आयटी क्षेत्रातील रोजगार वृद्धीला स्टार्टअप कंपन्यांनीही हातभार लावला आहे. रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन इत्यादी क्षेत्रांत स्टार्टअप कंपन्यांनी चांगले काम केले आहे. त्यामुळे नोकरभरतीत वाढ झाली आहे.‘नोकरी डॉट कॉम’चे मुख्य विक्री अधिकारी व्ही. सुरेश यांनी सांगितले की, जॉबस्पीक निर्देशांक आपली गती कायम राखून आहे. आॅक्टोबरमध्ये नेत्रदीपक २१ टक्के वाढीसह त्याने झेप घेतली आहे. रोजगार शोधणाºयांसाठी हा शुभसंकेत आहेत. शहरांचा विचार करता, मेट्रोपोलिटन शहरांत सर्वाधिक वाढ पाहायला मिळाली. २३ टक्के वाढीसह चेन्नई आणि दिल्ली पहिल्या स्थानी आहेत.असा काढतात जॉबस्पीक निर्देशांक‘नोकरी डॉट कॉम’वर दर महिन्याला नोंद होणाºया रोजगार नोंदणीच्या आधारावर हा निर्देशांक तयार केला जातो. निर्देशांकासाठी जुलै २00८ हा महिना आधार महिना म्हणून गृहीत धरण्यात आला आहे.या महिन्याला १ हजार अंक देण्यात आले आहेत. त्यापुढील महिन्यांची आकडेवारी या महिन्याच्या तुलनेत मोजून निर्देशांक ठरविले जातो.

टॅग्स :नोकरीकर्मचारीमाहिती तंत्रज्ञान