Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता ‘कोकाकोला’ खरेदी करणार इलॉन मस्क?; म्हणाले, ‘कोकिन’ टाकून विकणार ड्रिंक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 06:58 IST

अवघ्या दोन तासांमध्येच त्यांच्या ट्विटला १६ लाखांहून जास्त लोकांकडून लाईक्स मिळाले आहेत.

न्यूयॉर्क : सोशल मीडियावरील लोकप्रिय माइक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचे नवे मालक झाल्यानंतर टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क अजून एक मोठी आणि लोकप्रिय कंपनी खरेदी करण्याच्या विचारात आहेत. तसे संकेत त्यांनी दिले आहेत.

शीतपेय कंपनी ‘कोकाकोला’ खरेदी करणार असल्याचं मस्क म्हणाले. “आता मी कोकाकोला खरेदी करेन आणि त्यात पुन्हा कोकिन टाकायला सुरुवात करेन”, असं ट्विट मस्क यांनी केलं. यामुळे सोशल मीडियामध्ये एकच खळबळ उडाली आहे. नेटकऱ्यांमध्ये याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. अवघ्या दोन तासांमध्येच त्यांच्या ट्विटला १६ लाखांहून जास्त लोकांकडून लाईक्स मिळाले आहेत.मस्क हे कोकाकोला खरेदी करणार आहेत की नाहीत याबाबत ठोस माहिती मिळालेली नाही. पण, मस्क ज्या पद्धतीने व्यावसायिक जगतात पाऊल ठेवत आहेत. त्यामुळे अनेक उद्योगांना आगामी काळात आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.

टॅग्स :एलन रीव्ह मस्क