Join us

विना डिग्रीच Elon Musk देताहेत नोकरी, आणली नवी जॉब ऑफर; कसा करायचा अर्ज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 11:55 IST

Elon Musk Job Offer : टेस्ला आणि स्पेसएक्सचे संस्थापक इलॉन मस्क यांनी काढलेली ही जॉब ऑफर खूप खास आहे. पाहा कोणत्या पदासाठी मस्क यांनी अर्ज करायला सांगितलाय.

Elon Musk Job Offer : टेक दिग्गज इलॉन मस्क यांनी सॉफ्टवेअर इंजिनीअर पदासाठी नवीन नोकरीची ऑफर दिली आहे. टेस्ला आणि स्पेसएक्सचे संस्थापक इलॉन मस्क यांनी काढलेली ही जॉब ऑफर खूप खास आहे कारण त्यासाठी अर्ज करणाऱ्या तरुणांना कोणत्याही पदवी आणि अनुभवाची गरज भासणार नाही. आपल्याला पदवी किंवा अनुभवानं फरक पडत नाही, फक्त काम करणं महत्त्वाचं आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलंय. जाणून घेऊया काय आहे मस्क यांची ही नवीन जॉब ऑफर.

सॉफ्टवेअर इंजिनीअरच्या शोधात

इलॉन मस्क यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. यात त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनिअर पदासाठी नोकरीची ऑफर दिलीये. खरं तर मस्क एक नवीन अॅप तयार करत आहेत, जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या गुणवत्तेबरोबरच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसारख्या गोष्टी करू शकतात. एव्हरीथिंग अॅप असं याचं नाव आहे. यासाठी एलन मस्क यांनी सॉफ्टवेअर इंजिनीअर पदासाठी नोकरी देऊ केली आहे.

"जर तुम्ही हार्डकोर सॉफ्टवेअर इंजिनीअर असाल आणि 'एव्हरीथिंग अॅप' तयार करू इच्छित असाल तर तुम्ही तुमचं सर्वोत्तम काम code@x.com पाठवू शकता आणि आमचा भाग बनू शकता. तुम्ही कोणत्या शाळेत शिकलात, कॉलेजला गेलात की कोणत्या मोठ्या नावाच्या कंपनीत काम करत आहात, याला महत्त्व नाही. तुम्ही फक्त तुमचा कोड दाखवा," असं मस्क यांनी म्हटलंय.

शिक्षणाबद्दल काय म्हणणं?

मस्क यांनी काढलेली ही नोकरीची ऑफर मस्क यांना फक्त कामाप्रती असलेली काळजी दर्शवते. कोडिंग कसं करावं हे माहित असलेल्या एखाद्याच्या शोधात ते आहेत. त्यांना शिक्षणाची काहीच हरकत नाही. शाळांनी मुलांना समस्या सोडवण्याचे कौशल्य कसे हाताळावं हे शिकविण्यावर भर दिला पाहिजे, न केवळ रट्टा मारून परीक्षा द्यायला शिकवलं पाहिजे, असंही मस्क म्हणाले.

टॅग्स :एलन रीव्ह मस्कटेस्ला