Join us

Elon Musk America Party: मस्क यांच्या पक्षात भारतीय वंशाच्या वैभव यांच्याकडे मोठी जबाबदारी; कमाई पाहून अवाक् व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 13:37 IST

जाणून घ्या कोण आहेत वैभव तनेजा. पक्षात त्यांच्याकडे कोणती जबाबदारी देण्यात आलेली आहे. मस्क यांच्यासोबत अनेकवर्षांपासून करताहेत काम.

Musk America Party: टेस्लाचे सीएफओ (Chief Financial Officer) वैभव तनेजा यांना इलॉन मस्क यांच्या नवीन राजकीय पक्ष 'अमेरिका पार्टी' मध्ये मोठी जबाबदारी मिळाली आहे. मस्क यांनी वैभव तनेजा यांची पक्षाच्या कस्टोडियन ऑफ रेकॉर्ड्स आणि   म्हणून निवड केली आहे. द वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, वैभव यांनी २०२४ मध्ये १३९ दशलक्ष डॉलर्स (सुमारे १,१५७ कोटी रुपये) कमावले. ही रक्कम जगातील कोणत्याही सीएफओच्या कमाईपेक्षा अधिक आहे. त्यांचं पॅकेज मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नाडेला आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यापेक्षा खूप जास्त होतं.

कामाचा मोठा अनुभव

२०१७ मध्ये टेस्लामध्ये सामील होण्यापूर्वी, भारतीय वंशाच्या वैभव यांनी सोलर सिटीमध्ये एक वर्ष काम केलं. ही स्वतः मस्क यांनी स्थापन केलेली सौर ऊर्जा कंपनी आहे. वैभव यांनी भारत आणि अमेरिकेत प्राइस वॉटरहाऊस कूपर्स (पीडब्ल्यूसी) मध्ये १७ वर्षे (१९९९ ते २०१६) काम केलं.

HDFC मधून लोन घेतलंय? बँकेनं ग्राहकांना दिला दिलासा; कर्जाचे व्याजदर होणार कमी, पाहा नवे दर

२०१७ मध्ये, ते टेस्लामध्ये सहाय्यक कॉर्पोरेट कंट्रोलर म्हणून सामील झाले. २०१८ मध्ये, ते कंपनीचे कॉर्पोरेट कंट्रोलर म्हणून निवडले गेले. २०१९ मध्ये, त्यांना मुख्य लेखा अधिकारी पदावर बढती देण्यात आली. दोन वर्षांनंतर, २०२१ मध्ये, वैभव यांना टेस्लाच्या भारतीय उपकंपनी टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक म्हणून नियुक्त करण्यात आलं. त्यानंतर ऑगस्ट २०२३ मध्ये, त्यांना टेस्लाचे मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलं.

मस्क यांनी बनवला नवा पक्ष

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या वादानंतर काही आठवड्यांनीच त्यांनी त्यांच्या नवीन 'अमेरिकन पार्टी'ची घोषणा केली. आपला पक्ष त्या ८० टक्के अमेरिकन मतदारांचा आवाज बनेल जे रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्सवर समाधानी नाहीत, असं मस्क म्हणाले होते. ट्रम्प यांच्या 'बिग ब्युटीफुल बिल'वर मस्क यांनी केलेल्या टीकेनंतर हा पक्ष स्थापन करण्यात आला.

वैभव यांची पक्षात जबाबदारी काय?

आता जाणून घेऊया पक्षात वैभव यांची जबाबदारी काय असेल? सहसा, ट्रेजरर पक्षाच्या आर्थिक व्यवस्थापनाची जबाबदारी घेतो. ट्रेजररचं काम पक्षाचं वार्षिक बजेट बनवणं आणि त्याला मॅनेज करणं असतं, ज्यामध्ये उत्पन्न आणि खर्च दोन्ही समाविष्ट असतात.

ट्रेजररला सर्व व्यवहारांची नोंद देखील ठेवावी लागते आणि सर्व खर्च पक्षाच्या नियमांनुसार आहेत याची खात्री देखील करावी लागते. ट्रेजरर पक्षासाठी निधी उभारण्यासाठी देणग्या आणि इतर स्रोतांचा वापर करतो. पक्षासाठी निधी कसा उभारायचा, कुठे गुंतवणूक करायची आणि आर्थिक जोखीम कशी व्यवस्थापित करायची याची देखील जबाबदारी ट्रेजररची असते.

टॅग्स :एलन रीव्ह मस्कटेस्लाअमेरिकाडोनाल्ड ट्रम्प