Electric Vehicle Market: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची (EV) मागणी झपाट्याने वाढत आहे. याची प्रचिती नुकतीच आली. आर्थिक वर्ष २०२५-२६ (FY26) मध्ये EV विक्रीत मोठी वाढ नोंदवली गेली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन (FADA) च्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण EV रिटेल विक्री २४.६% वाढून २४.५२ लाख युनिट्सपर्यंत पोहोचली आहे.
सर्व सेगमेंटमध्ये दुप्पट वाढ
FADA च्या अहवालानुसार, इलेक्ट्रिक टू-व्हीलर, थ्री-व्हीलर, पॅसेंजर व्हीकल आणि कमर्शियल व्हीकल, या सर्व श्रेणींमध्ये डबल डिजिट ग्रोथ नोंदवली गेली आहे. FADA चे अध्यक्ष सी एस विग्नेश्वर यांनी सांगितले की, FY26 हे भारताच्या इलेक्ट्रिक मोबिलिटीसाठी ऐतिहासिक वर्ष ठरले आहे.
इलेक्ट्रिक कार विक्रीत मोठी झेप
FY26 मध्ये इलेक्ट्रिक कार विक्री १,९९,९२३ युनिट्स (FY25: १,०८,८७३) झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात ८३.६३% वाढ झाली आहे.
या सेगमेंटमध्ये आघाडीवर:
Tata Motors - ७८,८११ युनिट्सJSW MG Motor India - ५३,०८९ युनिट्सMahindra & Mahindra - ४२,७२१ युनिट्स
टू-व्हीलर सेगमेंटमध्येही जोरदार वाढ
एकूण विक्री - १४,०१,८१८ युनिट्स
आघाडीच्या कंपन्या:
TVS Motor Company - ३,४१,५१३ युनिट्सBajaj Auto - २,८९,३४९ युनिट्सAther Energy - २,३९,१७८ युनिट्स
कमर्शियल वाहनांमध्ये दुप्पट वाढइलेक्ट्रिक थ्री-व्हीलर - ८,३०,८१९ युनिट्स (१८.९७% वाढ)इलेक्ट्रिक कमर्शियल व्हीकल - १९,४५४ युनिट्सवाढ -तब्बल १२०.५७%
भारतामध्ये EV विक्रीतील ही वाढ केवळ ऑटो उद्योगाची प्रगती नसून, देशातील ऊर्जा संक्रमण प्रक्रियेची मजबूत सुरुवात दर्शवते. आगामी काळात EV बाजार आणखी वेगाने वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
Web Summary : India's electric vehicle market booms with a 24.6% sales increase, reaching 2.45 million units. All segments, including two-wheelers and cars, experienced double-digit growth. Tata Motors leads car sales, while TVS dominates the two-wheeler segment. Experts predict continued rapid growth.
Web Summary : भारत का इलेक्ट्रिक वाहन बाजार 24.6% की बिक्री वृद्धि के साथ फलफूल रहा है, जो 2.45 मिलियन यूनिट तक पहुंच गया है। दोपहिया और कारों सहित सभी खंडों में दोहरे अंकों की वृद्धि हुई। टाटा मोटर्स कार की बिक्री में आगे है, जबकि टीवीएस दोपहिया खंड में अग्रणी है। विशेषज्ञों ने लगातार तेजी से विकास की भविष्यवाणी की है।