Join us

ओला, चेतक, TVS, एथर आणि व्हिडापैकी कोण आहे सरस? पाहा किंमत, रेंज आणि टॉप स्पीड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 10:50 IST

Electric Scooter : या सणासुदीला घरी इलेक्ट्रीक स्कूटर आणण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी बजेटमध्ये सर्वात बेस्ट स्कूटर घेऊन आलो आहोत.

Electric Scooter : दिवाळीत अनेकजण नवीन वाहन खरेदी करतात. सातत्याने वाढणारे पेट्रोलचे भाव पाहाता अनेकजण इलेक्ट्रीक दुचाकीचा पर्याय शोधत आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इलेक्ट्रीक स्कूटर बाजारात जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. ओला, बजाज, टीव्हीएस, एथर आणि हिरो या प्रमुख कंपन्यांनी दमदार मॉडेल्स बाजारात आणले आहेत. २०२५ मध्ये तुम्ही उत्तम रेंज, फीचर्स आणि परफॉर्मन्स असलेली स्कूटर शोधत असाल, तर या टॉप मॉडेल्सची तुलना जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

या सर्व स्कूटर्सची तुलना किंमत, रेंज, स्पीड आणि फीचर्स या प्रमुख निकषांवर करण्यात आली आहे.

  • सर्वात स्वस्त: व्हिडा व्ही१ प्रो (₹१,२९,९००) आणि ओला एस१ प्रो (₹१,२९,९९९) या किमतीत फीचर्सचा चांगला समतोल देतात. व्हिडाची स्पर्धा थेट ओलासोबत आहे.
  • मध्यम आणि प्रीमियम: टीव्हीएस आयक्यूब एसटी (₹१,३५,०००) मध्यम किमतीत उत्तम रेंज देते, तर एथर ४५०एक्स (₹१,४४,०००) स्पोर्टी परफॉर्मन्ससाठी प्रीमियम किंमत घेते.
  • प्रीमियम बिल्ड: बजाज चेतक प्रीमियम (₹१,४९,९९९) मेटल बॉडी आणि मजबूत ब्रँड व्हॅल्यूमुळे थोडी महाग आहे.

रेंज आणि बॅटरी (लांब प्रवासासाठी कोण बेस्ट?)

मॉडेलबॅटरी (kWh) IDC प्रमाणित रेंज (किमी)चार्जिंग वेळ (अंदाजित)
टीव्हीएस आयक्यूब एसटी५.१२१४ किमी४.५ तास (फास्ट चार्जर)
ओला एस१ प्रो४.०१८२ किमी६.५ तास
एथर ४५०एक्स३.७१५३ किमी५.४५ तास
बजाज चेतक प्रीमियम |३.०१२६ किमी४ तास
व्हिडा व्ही१ प्रो३.९४११० किमी५.१५ तास

आयडीसी रेंजमध्ये TVS iQube ST (२१४ किमी) सर्वात पुढे आहे. व्हिडाची रेंज कमी असली तरी त्यात रिमूव्हेबल बॅटरी असल्याने घरी चार्ज करणे सोपे होते.

परफॉर्मन्स आणि स्पीड

  1. ओला एस१ प्रो ही स्कूटर १२० किमी/तास टॉप स्पीड आणि फक्त २.६ सेकंदात ०-४० किमी/तास वेग पकडते. हायवेसाठी हा उत्तम पर्याय आहे.
  2. स्पोर्टी राईड: एथर ४५०एक्स ९० किमी/तास टॉप स्पीडसह स्पोर्टी राईडसाठी ओळखली जाते.
  3. संतुलित: TVS iQube (८२ किमी/तास) आणि व्हिडा V1 प्रो (८० किमी/तास) सिटी राईडसाठी संतुलित परफॉर्मन्स देतात.
  4. गती मर्यादा: बजाज चेतकचा टॉप स्पीड ७० किमी/तास इतका मर्यादित आहे.

फीचर्स आणि कनेक्टिव्हिटी

  • ओला एस१ प्रो मध्ये क्रूझ कंट्रोल, इनबिल्ट स्पीकर आणि MoveOS अॅपसारखे सर्वात जास्त फीचर्स आहेत.
  • टेक-सेव्ही: एथर ४५०एक्स मध्ये Google नकाशे, OTA अपडेट्स (Over-The-Air) आणि उत्तम ॲक्सिलरेटर फीडबॅक मिळतो.
  • बॅटरी सुविधा: व्हिडा व्ही१ प्रो ची रिमूव्हेबल बॅटरी आणि हीरोचे मोठे सर्व्हिस नेटवर्क हे मोठे प्लस पॉइंट आहेत.
  • कम्फर्ट: TVS iQube ST ची सीट हाईट (७७० mm) कमी असल्यामुळे ती कुटुंबासाठी आणि महिलांसाठी सर्वात सोयीस्कर मानली जाते.

वाचा - असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या

कोणती घ्यावी?

  1. जर तुम्हाला बेस्ट फीचर्स आणि स्पीड हवा असेल, तर ओला S1 Pro.
  2. जर तुम्हाला सर्वोत्तम रेंज आणि कम्फर्ट हवा असेल, तर TVS iQube ST.
  3. जर तुम्हाला प्रीमियम बिल्ड क्वालिटी आणि क्लासिक डिझाइन हवा असेल, तर बजाज चेतक प्रीमियम.
  4. जर तुम्हाला रिमूव्हेबल बॅटरीची सोय आणि चांगले नेटवर्क हवे असेल, तर व्हिडा V1 प्रो.
English
हिंदी सारांश
Web Title : Ola, Chetak, TVS, Ather, Vida: Which electric scooter is best?

Web Summary : Electric scooter comparison: Ola S1 Pro offers speed, TVS iQube ST excels in range. Bajaj Chetak has premium build. Vida V1 Pro features removable batteries.
टॅग्स :इलेक्ट्रिक कार / स्कूटरबजाज ऑटोमोबाइलहिरो मोटो कॉर्पओला