Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL सुरू होण्याच्या आधीच Dream 11 नं दिली खुशखबर! पुन्हा मिळणार पैसे कमावण्याची संधी; कसं, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 15:20 IST

Dream Street Finance App: आयपीएलचे सामने सुरू व्हायला अवघे २ दिवस उरले असताना, ड्रीम-११ नं आपल्या युजर्सना एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. पाहा काय आहे कंपनीचा प्लॅन.

Dream Street Finance App: आयपीएलचे सामने सुरू व्हायला अवघे २ दिवस उरले असताना, ड्रीम-११ नं आपल्या युजर्सना एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. स्पोर्ट्स एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्म ड्रीम-११ ची मूळ कंपनी 'ड्रीम स्पोर्ट'नं युजर्सना पुन्हा एकदा पैसे कमावण्याची संधी दिली आहे, परंतु यावेळी प्लॅटफॉर्म वेगळा आहे. ड्रीम स्पोर्टनं आता ऑनलाइन गेम आणि बेटिंग सोडून शेअर बाजारात पाऊल ठेवलं असून त्यासाठी 'ड्रीम स्ट्रीट' (Dream Street) नावाचं ब्रोकिंग प्लॅटफॉर्म तयार केलंय.

ड्रीम स्पोर्टचे सीईओ हरीश जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने सर्व आवश्यक लायसन्स मिळवले असून सध्या अंतिम टेस्टिंग सुरू आहे. टेस्टिंग पूर्ण होताच हे प्लॅटफॉर्म लोकांसाठी लाँच केलं जाईल. सरकारनं सर्व प्रकारच्या ऑनलाइन गेम आणि बेटिंग प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्यानंतर ड्रीम-११ ला आपला तो व्यवसाय बंद करावा लागला आहे. त्यामुळे कंपनीने आपल्या मोठ्या युजर बेसचा वापर शेअर बाजार ट्रेडिंगसाठी करण्याचा निर्णय घेतला आहे.

उच्चांकापासून ₹१.८५ लाखांनी स्वस्त झाली चांदी, आता कुठपर्यंत येईल भाव; काय म्हणताहेत एक्सपर्ट?

काय आहे या प्लॅटफॉर्मची वैशिष्ट्ये?

ड्रीम स्ट्रीटचं टार्गेट टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये एआय-आधारित (AI) गुंतवणूक टूल्स लाँच करण्याचं आहे. हरीश जैन यांनी सांगितलं, आज शेअर बाजारात जे लोक पैसे गमावत आहेत, त्यांना वैयक्तिक स्तरावर योग्य माहिती देणारं कोणीही नाही. आमचं एआय या बाबतीत मदत करू शकतं.

ज्या गुंतवणूकदारांनी पैसे गमावले आहेत, त्यांना गोल्डमन सॅक्स, मॉर्गन स्टॅन्ले आणि जेपी मॉर्गन सारख्या तज्ज्ञांच्या सेवा या प्लॅटफॉर्मद्वारे मिळू शकतील. हे सर्व ब्रोकिंग हाऊस आमच्या प्लॅटफॉर्मवर गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओचे २४ तास निरीक्षण करतील.

ड्रीम स्पोर्टचा ८ वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये विस्तार

मनीकंट्रोलच्या माहितीनुसार, ड्रीम स्पोर्टनं आता स्वतःला ८ वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये विभागलं आहे. कंपनीनं मुंबई रग्बी टीम आणि इंग्लंडच्या प्रोफेशनल फुटबॉल क्लबसह अनेक स्पोर्ट्स लीगमध्ये गुंतवणूक केली आहे. ड्रीम फाउंडेशनसह आता एकूण ११ व्यवसाय झाले आहेत. ऑनलाइन गेमिंग कायद्यामुळे फँटसी स्पोर्ट्स बिझनेस मॉडेल प्रभावित होऊन कमाई ९५ टक्क्यांनी कमी झाल्यानं कंपनीनं ही पुनर्रचना केली आहे.

गेल्या वर्षापासून कार्यरत आहे फायनान्स ॲप

ड्रीम स्पोर्ट्सचे फायनान्स ॲप गेल्या वर्षी (२०२५) पासूनच कार्यरत आहे. सुरुवातीला यावर सोने आणि एफडीमध्ये गुंतवणुकीचा पर्याय मिळत होता, नंतर त्यात म्युच्युअल फंडाची सुविधा जोडण्यात आली. या सेवेसाठी कंपनीनं ऑगमोंट, आयसीआयसीआय प्रू म्युच्युअल फंड आणि इन्क्रेड फायनान्स सारख्या कंपन्यांशी भागीदारी केली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Dream11 offers investment opportunity before IPL via 'Dream Street'.

Web Summary : Dream11's parent company, Dream Sport, launches 'Dream Street,' a stock broking platform. This offers users a new avenue for financial investment, expanding beyond fantasy sports. Aiming for tier-2 and tier-3 cities, it features AI-based tools and expert portfolio monitoring after facing online gaming restrictions.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक