Join us

डोनाल्ड ट्रम्प यांचा एक कठोर निर्णय; भारताचे दरवर्षी ५८००० कोटी रुपयांचे होणार नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 13:14 IST

US tariff Impact on India : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. मात्र, या भेटीनंतर ट्रम्प यांनी भारताच्या मालावर आयात शुल्क लादण्याची धमकी दिली आहे.

US tariff Impact on India : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच अमेरिकेचा २ दिवसीय दौरा केला. या दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चर्चा झाली. दोन्ही देशांत चांगले संबंध असून ट्रम्प मित्र असल्याचेही पीएम मोदी यांनी सांगितले. अमेरिकेतील गेल्या निवडणुकीवेळीही मोदींनी ट्रम्प यांच्यासाठी मोठा कार्यक्रम केला होता. मात्र, यानंतरही ट्रम्प यांनी आपलं खरं रुप दाखवलं आहे. आयात शुल्क लादण्याची धमकी देऊन भारतासह संपूर्ण जगाला ट्रम्प घाबरवू पाहत आहेत.

वास्तविक, डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिलपासून 'रेसिप्रोकल टॅरिफ' लागू करण्याची धमकी दिली आहे. या धमकीनंतर भारतातील अनेक निर्यात क्षेत्रातील चिंता वाढली आहे. याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला सुमारे ७ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ५८,००० कोटी रुपयांचे दरवर्षी नुकसान होईल, असा अंदाज आहे.

अनेक क्षेत्रांवर होणार परिणामसिटीग्रुपच्या अहवालानुसार, ट्रम्प सरकारच्या या निर्णयामुळे भारताला दरवर्षी ५८,००० कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. भारत सरकार या नवीन टॅरिफ रचनेला समजून घेण्यासाठी आणि संरक्षण करण्यासाठी अमेरिकेसोबत एक नवीन व्यापार करार तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. या दराचा सर्वाधिक फटका रसायने, धातू उत्पादने आणि ज्वेलरी क्षेत्रांना बसणार असल्याचे मानले जात आहे. याशिवाय ऑटोमोबाईल, फार्मास्युटिकल्स आणि फूड प्रोडक्ट क्षेत्रावरही परिणाम होणार आहे. कापड, चामडे आणि लाकूड उत्पादनांवरही परिणाम होईल. परंतु, इतर क्षेत्रांच्या तुलनेत त्याचा कमी परिणाम होईल.

भारत अमेरिकेत सर्वाधिक निर्यात कशाची करतो?फायनान्शिअल एक्सप्रेसवर प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, भारताने २०२४ मध्ये अमेरिकेला सर्वाधिक मोती, रत्ने आणि दागिन्यांची निर्यात केली. त्यांची किंमत अंदाजे ८.५ अब्ज डॉलर्स होती. तर फार्मास्युटिकल्स दुसऱ्या क्रमांकावर होते. अमेरिकेत ८ अब्ज डॉलर्सची उत्पादने निर्यात केली. यानंतर पेट्रोकेमिकल्स उत्पादनांचा नंबर येतो. त्यांची किंमत ४ अब्ज डॉलर्स होती. भारताचा सरासरी एकूण व्यवसाय टॅरिफ ११ टक्के आहे, जो अमेरिकेच्या २.८ टक्क्यांपेक्षा खूप जास्त आहे. यामुळेच अमेरिका 'रेसिप्रोकल टॅरिफ'चा मुद्दा उपस्थित करत आहे.

भारतापेक्षा अमेरिकेला जास्त समस्या का आहेत?अमेरिका भारताला दरवर्षी ४२ अब्ज डॉलरच्या उत्पादन वस्तूंची निर्यात करते. भारतामध्ये यावर प्रचंड शुल्क आकारले जाते. जसे की लाकूड आणि यंत्रसामग्रीवर ७ टक्के, शूज आणि वाहतूक उपकरणांवर १५-२० टक्के, खाद्य उत्पादनांवर ६८ टक्के दर आहे. अमेरिकेचा खाद्यपदार्थांवर सरासरी टॅरिफ फक्त ५ टक्के आहे, तर भारत ३९ टक्के दर लावतो. भारत अमेरिकन मोटारसायकलवर १०० टक्के टॅरिफ लादतो, तर अमेरिका भारतीय बाईकवर फक्त २.४ टक्के शुल्क लावते. त्यामुळे ट्रम्प यांनी जशास तसे आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पनरेंद्र मोदीअमेरिका