Donald Trump Tariff on India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुल्क लादल्यानंतर, भारत काय पावलं उचलणार याबद्दल बरीच चर्चा झाली. आता भारतानं अमेरिकेला जशास तसं उत्तर देण्याची योजना आखली आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, भारत अमेरिकेतून येणाऱ्या काही वस्तूंवर कर लादण्याची तयारी करत आहे. अमेरिकेनं भारतातून येणाऱ्या स्टील आणि अॅल्युमिनियमवरील शुल्क ५०% नं वाढवल्यामुळे हे पाऊल उचललं जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारत सरकार या प्रकरणाचा गांभीर्यानं विचार करत आहे.
जर भारत सरकारनं या प्रस्तावाला मान्यता दिली तर ते अमेरिकेविरुद्धचं पहिलं मोठं पाऊल असेल. ३१ जुलै रोजी ट्रम्प यांनी भारतातून येणाऱ्या सर्व वस्तूंवर २५% कर लादला. त्यानंतर ६ ऑगस्ट रोजी अमेरिकेनं रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारतावर काही निर्बंध लादले आणि शुल्क ५०% पर्यंत वाढवले. स्टील आणि अॅल्युमिनियमवरील कराचा वाद फेब्रुवारीपासून सुरू आहे. त्यानंतर ट्रम्प सरकारनं या धातूंवर २५% कर लादला. जूनमध्ये हा कर ५०% पर्यंत वाढवण्यात आला. यामुळे भारताच्या सुमारे ७.६ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे.
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
भारतानं केली तयारी
भारतानं जागतिक व्यापार संघटनेत (WTO) हा मुद्दा उपस्थित केला होता. अमेरिकेनं 'राष्ट्रीय सुरक्षेच्या' नावाखाली हा कर लादला आहे, जो WTO च्या नियमांविरुद्ध असल्याचं भारतानं म्हटलंय. भारतानं म्हटलं आहे की हा एक प्रकारचा सुरक्षा उपाय आहे, परंतु तो WTO च्या नियमांचं उल्लंघन करतो. जेव्हा अमेरिका वाटाघाटी करण्यास तयार झाली नाही, तेव्हा भारतानं WTO च्या नियमांनुसार प्रत्युत्तर देण्याची तयारी दर्शविली आहे.
समान कर लावणार
एका सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार अमेरिका भारताच्या चिंता चर्चेद्वारे सोडवण्यास तयार नाही. त्यामुळे भारताकडे प्रत्युत्तर देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेनं भारताचं जेवढं नुकसान केलं आहे तितकेच अमेरिकेतून येणाऱ्या काही वस्तूंवर भारत समान प्रमाणात कर लादेल. एका अधिकाऱ्यानं सांगितले की, अमेरिकेच्या एकतर्फी आणि चुकीच्या कृतींना प्रत्युत्तर देण्याचा भारताला पूर्ण अधिकार आहे.
दोन्ही देशांमधील व्यापार किती?
अमेरिका भारताला ४५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या वस्तू विकते. भारत पूर्वी अमेरिकेला ८६ अब्ज डॉलर्सच्या वस्तू विकत होता, परंतु नवीन कर लागू झाल्यानंतर हा आकडा बदलू शकतो. जर भारतानं प्रत्युत्तर दिले तर व्यापारातील हा फरक आणखी वाढू शकतो.
फेब्रुवारीमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिळून व्यापार ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचं आश्वासन दिलं. त्यांनी असंही म्हटलं होतं की दोन्ही देश एकत्र चर्चा करतील. परंतु अमेरिकेला काही क्षेत्रांमध्ये अधिक प्रवेश हवा होता ज्यात भारत संवेदनशील आहे. म्हणून, याबाबतची चर्चा थांबली आहे.